Maharashtra Weather | महाराष्ट्रात किमान तापमान 6 अंशांनी खाली, ‘या’ जिल्ह्यात सर्वात कमी तापमान

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Weather | राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीची लाट उसळली आहे. हवामानात बदल झाल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील तापमानात (Maharashtra Weather) घट झाली आहे. त्यामुळे सर्वत्र थंडीचा (Cold) कडाका पडला आहे. तर, वायव्य भारत, मध्य भारताचा काही भाग आणि उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी 26 ते 29 जानेवारी दरम्यान थंडीच्या लाटेची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिली आहे.

 

रविवारी जोरदार वा-यामुळे कमाल तापमानाचा पारा खाली उतरला. राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा तडाका लागला. यामुळे राज्यातील वातावरणात बिघाड झाली. अवकाळी पावसाचा (Rains) आणि कडाक्याच्या थंडीचा (Cold) फटका काही भागातील पिकांना बसला. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला (Maharashtra Weather)आहे. दरम्यान, वाढत्या थंडीच्या कडाक्याने अनेक जनावरे देखील मृत्यु पडल्याचे दिसत आहे. रविवारपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, कोकण विभाग येथे किमान तापमान खाली उतरले. मुंबईमध्ये किमान तापमानात अवघ्या 24 तासात 6 अंशांचा फरक नोंदला आहे. तर राज्यात नाशिक, जळगाव, महाबळेश्वर, मालेगाव येथे तापमान 10 अंशापेक्षा कमी होते. महाबळेश्वर येथे 6.5 तर नाशिक येथे 6.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. (Maharashtra Weather Temperature)

 

मध्य महाराष्ट्रात इतर ठिकाणी, विदर्भ, मराठवाडा येथेही कमाल आणि किमान दोन्ही तापमानाचा पारा घसरला होता. पुण्यात 10.4, औरंगाबाद येथे 10.2, बुलडाणा येथे 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात मंगळवार ते गुरुवार दरम्यान थंडीची लाट जादा जाणवण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, जळगाव येथे 9.2, मालेगाव येथे 9.6, नाशिक येथे 6.6 तापमानाची नोंद झाली.
महाबळेश्वरमधील गेल्या 10 वर्षांमधील जानेवारीतील हे नीचांकी किमान तापमान होते.
या आधी 1968 मध्ये 5.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
नाशिकचा पारा मात्र जानेवारीमध्ये 5 अंशांपर्यंत पोहोचला आहे.
सर्वात कमी कमाल तापमान बुलडाणा येथे 20.3 अंश नोंदवले गेले आहे.
कोकण विभागातील कमाल तापमानाचा पाराही खाली घसरला.
कोकण विभागात सरासरीपेक्षा कमाल तापमान 4 ते 5 अंशांनी कमी होते.

 

Web Title :- Maharashtra Weather | weather today minimum temperature in the state dropped by 6 degrees lowest recorded in buldhana district

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा