राज्य Unlock करण्याची घाई करणार नाही, CM उध्दव ठाकरेंनी दिले संकेत

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – जूनपासून देशात मिशन बिगेन सुरू करण्यात आलं असलं तरीही महाराष्ट्रात अनलॉकची (अनलॉक 4) घाई करणार नाही असं स्पष्ट मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. आधी सर्व सुरू करायचं आणि नंतर पुन्हा बंद करायची वेळ येऊ नये. म्हणून खात्री झाल्याशिवाय अनलॉकचा निर्णय घेतला जाणार नाही असंही सीएम ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. जरी कोरोना नियंत्रणात आहे आणि ही चांगली बाब आहे तरीही कौतुकाला बळी पडू नका. कारण कोरोनाची दुसरी लाट येण्याचीही शक्यता आहे. मुख्य म्हणजे हा जगाचा अनुभव आहे. त्यामुळं गाफील राहू नका. असं आवाहनही सीएम ठाकरे यांनी केलं आहे.

केंद्र सरकारनं अनलॉक 4 ची प्रक्रिया सुरू केली आहे. गृह मंत्रालयाकडून लवकरच नव्या गाईडलाईन्स प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. सीएम उद्धव ठाकरेंनी ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोनाच्या स्थितीचा आढवा घेतला. यावेळी ठाणे पालिका मुख्यालयाच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह तीनही महापालिकांचे आयुक्त आणि सर्व अधिकारी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “देशात कोरोनाविरोधात जी लढाई सुरू आहे त्यात महाराष्ट्र कुठेही मागे नाही. एमएमआर रिजनमध्ये कोरोना रुणांची संख्या ही वाढतच होती. गेल्या महिन्याभरात डॉक्टर्स, नर्स, पोलीस, शासकीय आणि पालिका यंत्रणांनी चांगल्या पद्धतीनं मुकाबला केला असून या सर्व यंत्रणांचा अभिमान आहे” असंही ते म्हणाले.

सीएम ठाकरे पुढं म्हणाले की, “इतर राज्यात किंवा जगभरात लॉकडाऊन ओपन करण्याची घाई केली आहे. परंतु महाराष्ट्र तशी घाई अजिबात करणार नाही. एखादी गोष्ट करायची असेल तर त्याची खातरजमा केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.” असंही ते म्हणाले.