फडणवीसांकडून ठाकरे सरकारचा ‘भारुडा’च्या माध्यामातून ‘समाचार’, म्हणाले…

नागपूर, पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा भारुड वाचून समाचार घेतला. संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या भारुडाचा आधार घेत त्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना फडणवीसांनी तीन जणांची त्रेधातिरपीट यावर आधारित भारुड वाचले आणि तीन पक्षांच्या एकत्र येऊन स्थापन झालेल्या महाविकासआघाडीच्या सरकारवर टीकास्त्र डागले. या तीन पक्षांमुळे त्रिशंकूचा वेगळा अर्थ कळाला, ते म्हणाले की त्रिशंकू म्हणजे तीन पक्ष एकमेकांवर शंका घेणारे असा खोचक टोमणा देखील फडणवीस यांनी सरकारला लावला.

फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला की विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा आम्हाला मिळाल्या. जनादेश आमच्या बाजूने आहे. हे राजकीय स्वार्थाने तयार झालेले सरकार आहे. ते जनतेच्या मनातलं सरकार नाही.


फडणवीस म्हणाले की आम्ही कुठेही असलो आणि ते कुठेही असले तरी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी दैवताच्या ठिकाणीच राहतील. परंतु बाळासाहेबांना सेनेचा मुख्यमंत्री करण्याचा शब्द देताना, तो काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या मदतीनं करण्याचा दिला होता का?, असा खोचक सवाल फडणवीसांनी विचारला.


राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना फडणवीस म्हणाले की शिवसेनेने चुका केल्या, तर त्याच्यामागे तत्वज्ञान उभे करण्याचा प्रयत्न करु नये. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 25,000 रुपये हेक्टरी मदत करण्याचा शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी पाळावा. आश्वासने स्वत:च्या भरवशावर द्यायची असतात आणि स्वत:च्याच भरवशावर पाळायची असतात, असा टोमणा देखील फडणवीसांनी लगावला.


राज्याच्या आर्थिक स्थितीवर बोलताना फडणवीस म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादीने फडणवीस कारभारावर टीका केली होती, त्या टीकेला फडणवीसांनी उत्तर दिले. ते म्हणाले की राज्याची आर्थिक परिस्थिती ठीक नाही असं सांगून कव्हर फायरिंगचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. आम्हीसोबत असताना सर्व निर्णयात शिवसेना एकत्र होती आता ते चूक होते असं शिवसेना म्हणते. हे वदवून घेण्याचे काण काँग्रेस राष्ट्रवादी करणार आहे. सर्व निकषावर राज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे. हे मी नाही तर राज्याचा आर्थिक व्यवहार सांगतो.

फडणवीसांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली, ते म्हणाले की ग्रामविकासाच्या कामांना स्थगिती, नगरविकासाच्या कामांना स्थगिती, तीर्थक्षेत्रांच्या कामांना स्थगिती, प्रत्येक कामाला स्थगिती देण्याचे का सरकारने केले. स्थगिती सरकार अशी प्रतिमा होणं धोकादायक आहे. त्यामुळे तत्काळ कामं सुरु झाली पाहिजे अशी मागणी फडणवीसांनी केली.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/