मुंबई : कर्नाटकमधील आमदार वास्तव्यास असलेल्या हॉटेलबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कर्नाटकात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद मुंबईत पहायला मिळत आहेत. कर्नाटकमधील राजीनामा दिलेले आमदार मुंबईतील सोफीटेल हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या राजीनाम्यानंतर या हॉटेलबाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदारांनी केलेल्या बंडखोरीविरोधात आंदोलन केले. पोलिसांनी याप्रकरणी सुरज सिंह ठाकूर यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

काँग्रेस विधानसभेतील काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी राजीनामे दिले आहेत. या आमदारांनी आपला आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. यांनंतर हे आमदार बंगळुरु येथून मुंबईत दाखल झाले असून त्यांनी सोफीटेल हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला आहे. आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे मुंबई काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहेत. सध्या मुंबईतील अलिशान हॉटेलमध्ये एकूण दहा आमदार असून यामध्ये ७ काँग्रेसचे तर ३ जेईएसचे आहेत.

कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएसच्या १३ आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर राज्यातील एच.डी. कुमारस्वामी यांचे सरकार अस्थिर झाले आहे. हे सरकार कोसळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. हे सरकार वाचवण्यासाठी आघाडीच्या नेत्यांनी तर संधी मिळताच सत्तेची खुर्ची बळकावण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरु केले आहेत.

असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

 कर्नाटकातील सन्नतीला बौद्ध क्षेत्र घोषित करावे

लोकांना मारहाण करण्यासाठी ‘जय श्री राम’च्या नाऱ्याचा वापर : अमर्त्य सेन

मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा न्यायालयात आव्हान !