Maharashtra Yuva Sena | शिंदे गटाच्या युवासेनेच्या कार्यकारिणीत नेत्यांच्या मुलांचा भरणा, मोदींच्या घराणेशाही विरोधी धोरणास हरताळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Yuva Sena | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे सातत्याने घराणेशाहीवरून विरोधी पक्षांना धारेवर धरत असतात. विशेषता काँग्रेसमधील (Congress) घराणेशाहीवर ते नेहमी बोट ठेवतात. मोदींच्या घराणेशाहीविरोधी धोरणाला महाराष्ट्रात मात्र हरताळ फासला जात आहे. शिंदे गटाने (Shinde Group) नुकतीच युवासेनेची कार्यकारिणी (Maharashtra Yuva Sena) जाहीर केली असून यामध्ये नेत्यांच्या मुलांचा भरणा केला आहे.

 

मंत्री दादा भुसे (Dada Bhuse), भरत गोगावले (Bharat Gogawle), अर्जुन खोतकर (Arjun Khotkar), आमदार सदा सरवणकर (MLA Sada Saravankar), आमदार प्रकाश सुर्वे (MLA Prakash Surve), चौगुले व इतर नेत्यांच्या मुलांना या कार्यकारिणीत (Maharashtra Yuva Sena) संधी देण्यात आली आहे. तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासोबत काम करणार्‍या चेहर्‍यांनाही कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले आहे.

 

बंडखोरी केल्यापासून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे शिवसेनेला (Shivsena) सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने धक्के देत आहेत. प्रथम त्यांनी शिवसेनेवर आणि नंतर पक्षचिन्हावर हक्क सांगितला, त्यांच्या गटाची नवी कार्यकारिणी जाहीर केली होती. आता त्यांनी युवासेनेची देखील कार्यकारिणी जाहीर केली आहे.

युवा सेना कार्यकारणी सदस्य

उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) : अविष्कार भुसे (Avishkar Bhuse)

मराठवाडा (Marathwada) : अभिमन्यू खोतकर (Abhimanyu Khotkar), अविनाश खापे-पाटील (Avinash Khape-Patil)

कोकण (Konkan) :
रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg)
विकास गोगावले (Vikas Gogavle), रुपेश पाटील (Rupesh Patil), राम राणे (Ram Rane)

पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra) : किरण साळी (Kiran Sali), सचिन बांगर (Sachin Bangar)

कल्याण भिवंडी (Kalyan Bhiwandi) : दीपेश म्हात्रे (Dipesh Mhatre), प्रभुदास नाईक (Prabhudas Naik)

ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai) व पालघर (Palghar) : नितीन लांडगे (Nitin Londge), विराज म्हामुणकर (Viraj Mhamunkar), मानीत चौगुले (Maneet Chowgule), राहुल लोंढे (Rahul Londhe)

मुंबई (Mumbai) : समाधान सरवणकर (Saadhan Saravankar), राज कुलकर्णी (Raj Kulkarni), राज सुर्वे (Raj Surve), प्रयाग लांडे (Prayag Lande)

विदर्भ (Vidarbha) : ऋषी जाधव (Rishi Jadhav), विठ्ठल सरप पाटील (Vitthal Sarap Patil)

 

Web Title :- Maharashtra Yuva Sena | maharashtra cm eknath shinde team announced new yuva sena executive great opportunities for children of leaders of shinde group

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | हडपसर पोलिसांकडून चार गंभीर गुन्ह्यांची उकल; खुन, दरोड्यासह दोन जबरी चोरीतील ८ जणांना अटक

Kishori Pednekar | भाजपाच्या राम कदमांना शिवसेनेचे रोखठोक प्रत्युत्तर, पेंग्विन सेना महाराष्ट्राची, मुंबईची भरभराट करणार

Former MLA Mohan Joshi | ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यापारी आणि जनता भिकारी’ -मोहन जोशी