Maharashtrachi Hasya Jatra | ‘हास्यवीर’ ओंकार भोजने दिसणार ‘या’ नव्या कार्यक्रमात, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा घेणार निरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasya Jatra) कार्यक्रमातील विनोदी अभिनेता ओंकार भोजने (Omkar Bhojane) लवकरच हास्यजत्रेचा निरोप घेऊन नवीन कार्यक्रमात दिसणार आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ओंकार हा कॉमेडीच्या (Comedy Actor) परफेक्ट टाईमिंगसाठीही ओळखला जातो. ओंकार भोजने महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasya Jatra) या कार्यक्रमातून बाहेर पडणार असल्याने पुन्हा चर्चेत आला आहे.
ओंकार भोजने ’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून (Maharashtrachi Hasya Jatra) बाहेर पडणार असून तो लवकरच दुसर्या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. ओंकार लवकरच ‘फू बाई फू’च्या (Fu Bai Fu) नव्या पर्वात दिसणार आहे. ओकांर हास्यजत्रेतून बाहेर पडत असल्याने अनेक चाहते नाराज देखील झाले आहेत, तर काही चाहते फू बाई फू च्या नव्या पर्वात त्याला पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. त्याच्या या निर्णयावर वेगवगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
मनोरंजन मराठी ऑफिशिअल या इन्स्टाग्रामवर ओंकार भोजनेबाबत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर काही यूजर्स ओंकारला महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम बेस्ट असून तू उगाच सोडला, असे म्हणत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा बेस्ट आहे ऑल द टाईम, या कार्यक्रमातच छान होता तू, अशा कमेंट काहींनी केल्या आहेत.
सध्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांमध्ये हास्यजत्रा खुप लोकप्रिय आहे.
या कार्यक्रमाने जगभरातील रसिक प्रेक्षकांना हसायला भाग पाडले आहे.
हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
या कार्यक्रमातील अनेक विनोदवीर हे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असतात.
यामध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत.
Web Title :- Maharashtrachi Hasya Jatra | comedy king omkar bhojane exit from maharashtrachi hasyajatra
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Esmayeel Shroff Passed Away | ज्येष्ठ दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांचं निधन
Pune Crime | जमिनीच्या वादातून ट्रॅक्टर अंगावर घालून ४ वर्षाच्या मुलाचा केला खून; इंदापूरमधील घटना