उत्सुक नसलेल्या ‘या’ उमेदवारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा काँग्रेसचा घाट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आता सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत ते उमेदवारांचे . त्या-त्या मतदार संघात विरोधी पक्षाला टक्कर देण्यासाठी तगडे उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत पक्ष आहेत. असे असताना आता काँग्रेस पक्षाला उमेदवारांची कमतरता भासते की काय म्हणून इच्छा नसलेल्या उमेदवारांना जबरदस्तीने लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा घाट काँग्रेस पक्षाने घातला आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दरम्यान काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यामध्ये महाराष्ट्रातील पाच जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. लोकसभेच्या रिंगणात उतारण्याची इच्छा नसणाऱ्या काँग्रेसच्या तीन उमेदवारांची नावं या यादीत आहेत. प्रिया दत्त, सुशीलकुमार शिंदे आणि मिलिंद देवरा या तिन्ही उमेदवारांना पराभवाचा बदला घेण्यासाठी निवडणूक लढवून आणण्याचा घाट काँगेसच्या बड्या नेत्यांनी घातला आहे.

काँग्रेसचे स्टार प्रचारक – आगामी निवडणुकीत जिंकण्यासाठी काँग्रेसकडून बॉलिवूडमधल्या स्टार चेहऱ्यांना घेऊन निवडणूक रिंगणात उतारण्याची रणनीती आखली आहे. अभिनेत्री ईशा कोप्पीकरने देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर प्रिया दत्त ह्या देखील आगामी लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. प्रिया दत्त ह्या दिवंगत अभिनेते आणि काँग्रेस नेते सुनील दत्त यांच्या कन्या आहेत. दरम्यान यापूर्वी काँग्रेस अभिनेता सलमान खानला देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार अशी चर्चा होती.

सुशीलकुमार शिंदे
सोलापुरात पराभवाचा धक्का बसलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या शरद बनसोडेंनी शिंदेंना पराभवाची धूळ चारली होती. त्यानंतर लोकसभेच्या आखाड्यात पुन्हा न उतरण्याचा निर्धार सुशीलकुमार शिंदेंनी व्यक्त केला होता. मात्र सोनिया गांधींच्या आर्जवानंतर ते राजकीय पुनरागमन करण्याच्या बेतात आहेत.
प्रिया दत्त
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून प्रिया दत्त आपली प्रतिष्ठा पुन्हा पणाला लावणार आहेत. सुरुवातीला प्रिया दत्त यांनीही निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. मात्र पक्षातील दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनधरणीनंतर प्रिया दत्तही पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास तयार झाल्या आहेत. जेव्हा प्रिया दत्त इच्छुक नव्हत्या, तेव्हा अभिनेत्री नगमा, कृपाशंकर सिंह यांनी या जागेवर दावा सांगितला होता, मात्र प्रिया दत्त या मतदारसंघातील माजी खासदार असल्यामुळे त्यांच्या पारड्यात मत पडलं.
मिलिंद देवरा
काँग्रेसने जाहीर केलेल्या महाराष्ट्राच्या लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीतील तिसरं नाव आहे . माजी खासदार मिलिंद देवरा पक्षांतर्गत कटकटीला कंटाळल्यान पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचं सांगितलं होतं. मात्र पक्षाच्या आदेशानंतर ते दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सज्ज झाले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us