मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, ५३व्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा ‘निर्धार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपने युती केली. युती चांगल्या संख्येने निवडणुनही आली. आता या पक्षांना वेध लागले आहेत ते विधानसभेचे. भाजप अध्यक्षांनी राज्यात आपला मुख्यमंत्री असावा यासाठी कार्यकर्त्यांना प्रयत्न करण्यास सांगितले आहे. पण लोकसभेत युती करताना सर्व अटींमध्ये केंद्रात भाजप आणि राज्यात शिवसेना, अशीही अट असल्याचे म्हटलं जात होते. पण आता भाजप आपला मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र आज शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्तानं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून राज्यात आपला मुख्यमंत्री असवा, असा निर्धार व्यक्त केला आहे.

शिवसेनेच्या राजकारणात समाजकारण असल्यानेच आम्ही ही ५३ वर्षांची मजल मारू शकलो. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शिवसेना आज धारदार तलवारीच्या तेजाने तळपते आहे. भाजपशी ‘युती’ जरूर आहे, पण शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. एका निर्धाराने शिवसेना पुढे निघाली आहे. याच निर्धाराने आम्ही उद्याची विधानसभा ‘भगवी’ करून सोडू व शिवसेनेच्या ५४व्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल. चला, याच निर्धाराने कामाला लागूया, असं त्यांनी संपादकीय मध्ये म्हटलं आहे.

शिवसेना म्हणजे काय? हे महाराष्ट्राने किंवा देशानेच नव्हे तर संपूर्ण जगाने गेल्या ५३ वर्षांत अनुभवले आहे. मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी १९ जून हा भाग्याचाच दिवस मानावा लागेल. याच दिवशी शिवसेना नामक एका वादळाचा जन्म झाला. वादळे आणि वावटळी अनेकदा येतात आणि जातात, पण शिवसेना नावाचे वादळ ५२-५३ वर्षे सतत घोंघावत आहे. शिवसेनेचा वटवृक्ष आज बहरला आहे. महाराष्ट्रात त्याची पाळेमुळे घट्ट रुजली, फांद्या दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचल्या आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

राष्ट्राच्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिमेची प्रेतयात्रा काढणाऱ्या आणि समान नागरी कायद्याची होळी करणाऱ्या जात्यंधांना या देशात थारा नाही, असे खणखणीतपणे सांगणारे, परिणामांची पर्वा न करता ही भूमिका पुढे नेणारे एकमेव हिंदुहृदयसम्राट म्हणजे बाळासाहेब ठाकरे, असं त्यांनी म्हटलं.

प्रश्न धर्माचा नसून, मनात दडलेल्या राष्ट्रद्रोही विषवल्लीचा आहे. देशात धर्म अनेक असू शकतील, पण राष्ट्रात घटना एक हवी आणि कायदे सर्वांना सारखेच हवेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

“पॅरालिसिसकडे” दुर्लक्ष करू नका 

पालकभाजी आरोग्यासाठी फायदेशीर 

 ‘सेक्स पॉवर’ जागृत करण्‍यासाठी करा योगासने

फक्त “दारूमुळेच” जगभरात दरवर्षी ६ टक्के लोकांचा मृत्यू