महाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन ‘थरारक’ आत्महत्या

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – तरुणांना TikTok ने वेड लावले आहे. व्हिडीओ बनवून तो TikTok वर टाकून अनेक मित्र जोडण्याचे कौशल्य अनेकांना मिळालेलं आहे. लोकप्रिय असलेल्या TikTok मुळे अनेकजण प्रकाश झोतात आले. TikTok वर अनेक स्टार निर्माण झाले. त्यापैकीच एक सोलापूर येथील आकाश जाधव. आकाशला TikTok वर व्हिडीओ तयार करून टाकण्याचा छंद होता. त्याचे TikTok लाखो फॉलोअर्स आहे. TikTok वर स्टार असला तरी त्याची खरी दुनिया वेगळीच होती. २७ वर्षीय आकाशने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमुळे त्याच्या फॉलोअर्सला धक्का बसलाय.

आकाशने काही वर्षापूर्वी TikTok वर एक व्हिडिओ अपलोड केला. या व्हिडीओला प्रचंड प्रतिसाद मिळाला. चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आकाशला TikTok चे जणू वेडच लागले होते. तो व्हिडीओ तयार करून TikTok वर टाकू लागला. त्याचे फॉलोअर्स वाढू लागले आणि तो काही महिन्यातच स्टार झाला. मात्र, खऱ्या आयुष्यात तो तणावात होता.

तणावातून आकाशने झोपेच्या गोळ्या खाऊन घराजवळ असलेल्या रेल्वे ट्रॅकवर जाऊन झोपला. ही बाब लोकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने कोणाचेही न ऐकता तसाच पुढे जाऊन रेल्वे ट्रॅकवर जाऊन झोपला. दरम्यान, एका मालगाडीच्या खाली येऊन त्याचा मृत्यू झाला.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like