मानाचा मुजरा ! तरुणीचा हा ‘TikTok’ Video तुम्हीही पाहिला असेल ‘WhatsApp’ Status वर (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – TikTok ने देशभरात अनेकांना वेड लावले आहे. तरुणांपासून वृद्धापर्यंत सर्वच TikTok बनवताना आणि शेअर करताना दिसत आहेत. सध्या महाराष्ट्रात एका साडी नेसलेल्या तरुणीची व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. याला कारणं देखील तसंच आहे, 19 फेब्रुवारीला साजरी केली जाणारी शिवजयंती हे हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे मुख्य कारण आहे. हा व्हिडिओ इतका व्हायरल होत आहे की या व्हिडिओमुळेच राज्यातील वातावरण भगवामय झाल्याचे दिसत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे अराध्य दैवत आहेत. 19 फेब्रुवारीला देशभरात शिवजयंती साजरी होईल. यावर आधारित हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी नऊवारी साडी नेसून, पारंपारिक दागदागिणे घालून रस्त्याने चालत जात आहे, येणारा जाणारा प्रत्येक जण त्या मुलीसमोर मुजरा करताना, हात जोडताना दिसत आहे. सुरुवातीला या मुलीसमोर सर्व जण येऊन मुजरा का करतात, नमस्कार का करतात असा प्रश्न पडतो आणि अचानक पुढील दृश्य समोर येते. सर्वजण त्या तरुणीसमोर मुजरा का करतात हे उलगडलं. त्या तरुणीच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांची सुबक मूर्ती असते आणि येणारा जाणारा प्रत्येकजण त्या मूर्तीला बघून मुजरा करत असल्याचे लक्षात आलं.

हा व्हिडिओ शिवप्रेमी सर्वाधिक शेअर करत आहेत. शिवजयंतीच्या निमित्ताने हा TiKTok व्हिडिओ Whatsapp status वर सर्वाधिक शेअर केले जात आहेत. शिवप्रेमींकडून लाइक्सचा वर्षाव होत आहे.
शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमी अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. परंतु हा नऊवारी घेतलेल्या तरुणीचा ‘TikTok’ व्हिडिओ अनेकांच्या Whatsapp status वर झळकताना दिसत आहे.

You might also like