‘ते’ तर केवळ नाटक होतं, भाजप खासदार रावसाहेब दानवेंचा गौप्य्स्फोट ! नेमकं काय म्हणाले दानवे हे जाणून घ्या

जालना : पोलीसनामा ऑनलाईन –  लोकसभा निवडणुकीआधी नेते शिवसेना अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. काहीही झाले तरी दानवेंविरुद्ध लोकसभा निवडणूक लढविणारच असा निर्धारदेखील अर्जुन खोतकर यांनी केला होता. नंतर या दोन्ही नेत्यांनी एकत्र येत दानवे यांचा लोकसभेतील विजय साकारला होता. मात्र आज यासंदर्भात मोठा खुलासा रावसाहेब दानवेंनी जालन्यामधील सत्कार समारंभाच्या वेळी केला.

केंद्रीय ग्राहक संरक्षण राज्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सर्वपक्षीय सत्कार समारंभाचे आयोजन आज जालना येथे करण्यात आले होते. यावेळी दानवे यांनी ‘आम्हा दोघांमध्ये तर निवडणुकीपूर्वीच दोन महिने अगोदर सेटलमेंट झाली होती, नंतर फक्त नाटक सुरू होतं.’ असे वक्तव्य करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी ज्या जनतेमुळे आपण ३५ वर्षे सक्रिय राजकारणात राहिलो तीच आपली देव असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळविल्यानंतर मोदी सरकारमध्ये केंद्रीय ग्राहक संरक्षण राज्यमंत्रीपद दानवेंनी दिले गेले आहे. त्यानंतर जालना येथे सर्वपक्षीय राजकीय नेते आणि प्रतिष्ठीत नागरिकांच्या वतीने दानवे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी खोतकर यांनीही दानवेंचे तोंडभरून कौतुक केले.

काय म्हणाले अर्जुन खोतकर :

अमित शहा यांना भेटून विधानसभा निवडणुकीपर्यंत पर्यंत दानवेनाच प्रदेशाध्यक्षपदी राहू द्यावे अशी विनंती करणार असल्याचे अर्जुन खोतकर यांनी सांगितले. दानवे सतत्याने दैदीप्यमान यश मिळवत आहेत, त्यांच्या हातात जणूकाही जादूच आहे असेदेखील ते आपल्या खास शैलीत म्हणाले.

काय होता नेमका वाद :

खोतकरांचा आरोप होता कि, विधानसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी मदत केली नाही तर उलटपक्षी त्रासच दिला. त्यामुळे दानवेंविरुद्ध लोकसभा निवडणूक लढविण्याचा पवित्रा खोतकर यांनी घेतला होता. आवश्यकता भासल्यास पक्षही सोडण्याचे संकेत खोतकर यांनी दिले होते. परंतु युती झाल्याने भांडण मिटवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांसहित अनेकांनी पुढाकार घेतल्याने आपापसातील गैरसमज दूर करून दोन्ही नेते एकत्र झाले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like