भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानसभा निवडणूक लढणार ?

पुणे : पोलीसानामा ऑनलाईन – भाजपचे नेते आणि आता भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे सध्या राज्यातील दुसऱ्या स्थानावरचे मंत्री पद आहे. परंतू चंद्रकांत पाटील यांनी आजपर्यंत एकदाही निवडणूक लढवलेली नाही. ते दरवेळी विधानपरिषदेवरून आमदार झाले आहेत. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये चंद्रकांत पाटलांनी निडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. पुण्यात बोलत असताना, पक्षाने आदेश दिला तर विधानसभा निवडणूक लढवू, असं त्यांनी सांगितलं. सध्या राज्यात भाजपचे वातावरण झाले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकांच्या वेळी चंद्रकांत पाटलांनी बारामतीत जाणून थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान दिले होते. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका करत त्यांना लोकांमधून निवडून येऊन दाखवा, असं म्हटलं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील कोल्हापूरातून निवडणूक लढवू शकतात, असं बोलले जात आहे.

चंद्रकांत पाटलांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्रीपदावरून झालेल्या वादावर वक्तव्य केले. हा वाद उद्धव ठाकरे आणि भाजपचे श्रेष्ठी सोडवतील, असं त्यांनी म्हटलं. तसंच शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांच्या म्हणण्याला आम्ही महत्त्व देत नाही. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच नाही तर पंतप्रधान झालेलेही बघायला आवडेल, पण त्यांनी निर्णय घ्यावा, असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, तानाजी सावंत यांनी मित्रपक्षाने आम्हाला धमक्या देऊ नये. सत्तेचा माज, मस्ती उतरविण्याची ताकद शिवबंधनात आहे, अशी धमकीच दिली होती.

दरम्यान, चंद्रकांत पाटील हे अमित शहांचे विश्वासू आहेत. त्यांनी भाजपचे काम नेहमीच पडद्याआड राहून केले आहे. त्यांना भाजपमध्ये चांगला मान देण्यात येतो.

 

आरोग्यविषयक वृत्त –