राज्य लाड सोनार महाअधिवेशन समिती संपर्क व प्रसिद्धी प्रमुखपदी पत्रकार धर्मा मैड

शिरुर : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य लाड सोनार महाअधिवेशन समिती संपर्क व प्रसिद्धी प्रमुखपदी शिरुर येथील पत्रकार धर्मा मैड व पैठण येथील पत्रकार, ह.भ.प. चंद्रकांत अंबिलवादे यांची
निवड करण्यात आली आहे.

या निवडीबाबत नुकतीच अहमदनगर येथे महाराष्ट्र राज्य लाड सोनार महाअधिवेशन समितीचे स्वागत अध्यक्ष नितीन उदावंत, सावखेडकर, सुकाणू समिती सदस्य राजेंद्र डहाळे, अंबड, माजी नगराध्यक्ष व शिरुर सोनार समाज अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष अशोक राव कुलथे, माधवराव दहीवाळ, पुणे , संगमनेर येथील सुभाष शहाणे, परभणी येथील दिलीप डहाळे,संजय बोकन, जालना येथील गोपाळ नेवासेकर, औरंगाबाद येथील नंदु चिंतामणी, शशिकांत उदावंत, गणेश श्रीमाळी, सुनिल टेहरे, राम लोळगे यासह समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या वेळी महाराष्ट्र राज्य लाड सोनार महाअधिवेशन समितीचे स्वागत अध्यक्ष नितीन उदावंत, सावखेडकर, यांनी महाअधिवेशन समिती संपर्क व प्रसिद्धी प्रमुखपदी शिरुर येथील पत्रकार धर्मा मैड व पैठण येथील पत्रकार, ह.भ.प. चंद्रकांत अंबिलवादे यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर केले. या निवडीसाठी उपस्थित समाज बांधवांनी सहमती दर्शविली. यावेळी सुकाणू समिती सदस्य राजेंद्र डहाळे यांनी धर्मा मैड यांचा व अशोकराव कुलथे यांनी चंद्रकांत अंबिलवादे यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. यावेळी उपस्थित समाज बांधवांनी निवडीबद्दल अभिनंदन केले.

आरोग्यविषयक वृत्त –

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या