#VIDEO : मी काय म्हातारा झालोय काय ? बीडच्या सभेत शरद पवारांचा मिश्किलपणा

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – बीडच्या जाहिर सभेत शरद पवार यांनी मिश्किलपणे भाषण संपल्यानंतर गेवराईचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अमरसिंह पंडीत यांना एक वॉर्निंग दिली. अमरसिंह पंडीत यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांना या वयातही शरद पवार इतकं फिरतात. अस म्हटलं होतं. त्यावर शरद पवार म्हणाले, यापुढे असं बोलायचं नाही. मी काय म्हातारा झालोय का?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मिश्किलपणाने सभेतील लोकांची मनं जिंकतात. एखादी तंबी देतानाही ते मिश्लिकपणे देतात. बीड येथील जाहिर सभेत गेवराईचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमरसिंह पंडीत भाषणात म्हणाले होते. की शरद पवार या वयातही इतकं फिरतात. त्यानंतर शरद पवार यांचं भाषण झालं.

शरद पवार यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांना एक वॉर्निंग देतो. पुन्हा असं बोलायचं नाही. की मी या वयात एवढं फिरतो. मी काय म्हातारा झालोय का?
शरद पवार असं म्हणताच सभेत एकच हशा पिकला. आणि त्यांनी आपलं भाषण संपवलं.–

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like