सत्तेसोबत दारूची फॅक्टरीही आमच्या बहिणाबाईच्या घरात : धनंजय मुंडे

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – सर्व सत्ता आमच्या बहिणाबाईच्या घरात आहे. इतकेच नव्हे तर, सहकारी साखर कारखाने, दारूची फॅक्टरी त्यांच्याच घरात आहे. असा आरोप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. माजलगाव येथील कार्यकर्ता मेळावा बैठकीत त्यांनी हा आरोप केला आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दरम्यान, माजलगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे कार्यकर्ता मेळावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधतांना, सर्व सत्ता आमच्या बहिणाबाईच्या घरात आहेत. खासदारकी त्यांच्या घरात, आमदारकी त्यांच्या घरात, राज्याचे मंत्रीपद त्यांच्याच घरात, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद, वैद्यनाथ बँक आणि सहकारी साखर कारखाना त्यांच्यात घरात, दारूची फॅक्टरी त्यांच्याच घरात’ असा आरोपही विरोधी पक्ष नेते धंनजय मुंडे यांनी केला.

इतकेच नव्हे तर, एकाच घरात बीड जिल्ह्यातील जनतेने आमदारकी खासदारकी, राज्यची सत्ता, केंद्राची सत्ता, जिल्ह्याची सत्ता दिली. पण त्यांनी जनतेला काय दिले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच, साधा ऊसतोड मजुरांचा प्रश्नच सोडवू शकले नाहीत. असेही पाहणी म्हंटले. याचबरोबर स्वर्गीय गोपीनाथ मुंडेच्या नावाने गोपीनाथ गडावरून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ऊसतोड मजूर महामंडळाचे काय झाले. असा सवालही त्यांनी केला.

याचबरोबर, पंकजा मुंडे मंत्री मंडळात आहेत. आणि एखादे महामंडळ जर रद्द करायचे असेल तर मंत्री मंडळाची बैठक घेवून तो विषय रद्द करायचा असतो. मात्र महामंडळ रद्द करायच्या बैठकीत स्वत:च्या वडिलांच्या नावाने काढलेले ऊसतोड मजूर महामंडळ रद्द करताना मंत्री म्हणून मुंडे साहेबांच्या वारसाची सही असेल तर हे कीती दुर्दैव आहे. असेही त्यांनी म्हंटले.

यावेळी माजी मंत्री प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, बजरंग सोनवणे आदी उपस्थिती होते.