Maharera | ‘महारेरा’चा बिल्डरांना दणका ! पुणे जिल्ह्यातील 189 प्रकल्प ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये; फ्लॅट बुक करताना घ्या काळजी, पाहा यादी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील दीड वर्षापासुन कोरोनाने लोकं हतबल झाली आहेत. अनेकांचा व्यवसाय गेला तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अशातच आता, महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणने (महारेराने) (Maharera) कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘महारेराने’ (Maharera) राज्यातील 644 गृहबांधणी प्रकल्पांना ब्लॅक लिस्टमध्ये (Black list) टाकले आहे. 2017 ते 2019 या 3 वर्षांमध्ये प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱ्या प्रकल्पांना रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथोरिटी म्हणजेच महारेराकडून ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील (Pune District) 189 प्रकल्पांचा समावेश आहे.

maharera blacklists 189 projects pune know about it

644 गृहबांधणी प्रकल्पांना (Housing projects) काळ्या यादीत टाकल्याने या बांधकाम व्यावसायिकांना आता प्रकल्पातील कोणत्याही मालमत्तेची कोणताही व्यवहार करता येणार नाही. तसेच बांधकाम देखील करतां येणार नाही. याचबरोबर पुण्यातील बहुचर्चित लवासा प्रकल्प (Lavasa Project) देखील 2017 पासून बंद असल्याचे देखील उघडकिस आलं आहे. सध्या ब्लॅक लिस्टमध्ये (Black list) टाकलेल्या प्रकल्पांची टक्केवारी संपूर्ण राज्याच्या तुलनेत पुण्यातील 29 टक्के असल्याची माहिती समोर आलीय. पुण्यात 2017 पासून बंद असलेल्या प्रकल्पांची नावे देखील समोर आली आहेत. यांना देखील काळ्या यादीत टाकलं आहे. यामुळे आता बांधकाम व्यावसायिक मध्ये खळबळ माजली आहे.

या दरम्यान, महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणने (महारेराʼ) (Maha Rera) जारी करण्यात आलेल्या लिस्टमध्ये अनेक नावे देखील तांत्रिक त्रुटींमुळे समावेश झाली आहेत. महारेराकडे नोंदणी (Registration) केल्यानंतर 3 वर्षांनी त्या नोंदीची मुदत संपते. ती मुदत संपण्यापूर्वी जर बांधकाम व्यावसायिकाने सर्व सदनिका, गाळे विकले असतील मात्र 3 वर्षाच्या मुदतीनंतर महारेराला रिपोर्ट सादर केला नसेल तर तो व्यावसायिक त्यांच्या दृष्टीने दोषी ठरतो. त्याचा परिणाम संबंधितांना काळ्या यादीत (Black list) टाकण्यात झाल्याचे आम्हाला आढळून आले. म्हणून प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्र विचार करूनच पडताळणी करावी लागेल, अशी माहिती क्रेडाईचे (CREDAI) राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारीया (Shantilal Kataria) यांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्यासह राज्यातील ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेल्या इतर नावांची संपूर्ण यादी लिंकमध्ये –

https://maharera.mahaonline.gov.in/Site/1128/Lapsed-Projects

हे देखील वाचा

Child Pornography | महाराष्ट्रात Child Pornography च्या प्रकरणात प्रचंड वाढ; धक्कादायक माहिती समोर

Vacant Posts in Army | सैन्य दलात 1 लाख 21 हजार जागा रिक्त; संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  maharera blacklists 189 projects pune know about it

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update