‘जावई आहात तर जावयासारखे राहा, घरजावई का होताय’ ? चंद्रकांत पाटलांना पुणेकरांचे ‘चिमटे’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत. मात्र ते स्थानिक उमेदवार नसल्याने त्यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच स्थानिकांचा विरोध आहे. आता काही पुणेकरांनी खास पुणेरी शैलीत त्यांच्यावर सोशल मीडियावरून विरोध दर्शवला आहे. ‘चंद्रकांत पाटील यांचा कोथरूडमध्ये मागच्या दाराने प्रवेश’, ‘कोथरूडपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 जवळच आहे’, ‘आयत्या कोथरुडात कोल्हापूरचा चांदोबा’ असे समाजमाध्यमांतून उपहासात्मक भाष्यही केले जात आहे.

दादा तुम्ही फक्त डेक्कनपासून डहाणूकर कॉलनीपर्यंत रस्ता न विचारता येऊन दाखवावं, मग आम्ही समजू तुम्ही पुणेकर!’, ‘कधीही पराभव पाहिला नाही असे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना बारामतीमधून लढण्यास काय हरकत होती?’, ‘उमेदवार हा स्थानिक असावा, पुरात वाहून आलेला नसावा’, ‘जावई आहात तर जावयासारखे राहा, घरजावई का होताय?’, ‘पुणे आताच का आठवलं?’ असे विविध विनोद सोशल मीडियावरून फिरत आहेत. असे असतानाच ट्विटरवर टीकात्मक पोस्टना पाटील यांच्या समर्थकांकडून पाठिंबा देणाऱ्या पोस्टद्वारे उत्तरही देण्यात येत आहे.

चंद्रकांत पाटील आतापर्यंत विधान परिषदेवरच निवडून येत होते. परंतु, जनतेतून निवडून आल्याशिवाय मंत्रिपद नाही या मोदी-शाह स्ट्रॅटजीमुळे चंद्रकांत पाटलांना विधानसभेच्या निवडणुकीला उभे रहावे लागले आहे. त्यासाठी त्यांनी भाजपचा बालेकिल्ला आणि सर्वात सुरक्षित मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कोथरूड मतदार संघाची निवड केली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला काही स्थानिकांचा विरोध आहे. काही दिवसांपूर्वी दूरचा नको, घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे’ असे फलक कोथरूड परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले होते.

Visit : Policenama.com 

You might also like