स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारावर गोळीबार, कार पेटवली

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – अमरावती जिल्ह्यातील मोर्शी या विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी पक्षाचे उमदेवार देवेंद्र भुयार यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून त्यांना मारहाण करुन त्यांची कार पेटवून देण्यात आली. ही घटना सोमवारी सकाळी साडेपाच वाजता घडली. देवेंद्र भुयार यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

मोर्शीतून कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे आणि स्वाभिमानी पक्षाचे देवेंद्र भुयार हे आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात असून या दोघांमध्येच लढत आहे. देवेंद्र भुयार यांनी मतदारसंघात पैशांचे वाटप होत असल्याची तक्रार केली होती. देवेंद्र भुयार हे शेंदुर मार्गे वरुडकडे जात असताना पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांचे वाहन अडवून अचानक गोळीबार करण्यात आला. त्यांच्या वाहनातील लोकांना बाहेर काढून मारहाण करण्यात आली. त्यानंतर हल्लेखोरांनी कार पेट्रोल ओतून पेटवून देण्यात आली.

भुयार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऐन मतदानाच्या दिवशी हा प्रकार घडल्याने येथे काहीसा तणाव निर्माण झाला आहे.

visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like