विकासाची भूमिका ठेवणाऱ्या आ. जगतापांना सोसायटी धारकांचा पाठींबा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – हौसिंग सोसायट्यांना सामोरे जावे लागलेल्या समस्या एक-एक करून सोडवण्यात येत असून या निवडणुकीला सामोरे जाताना आपली विकासात्मक भुमिका असल्याचे चिंचवड मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले. यावरून प्रभाग 26 मधील सोसायटी धारकांनी आमदार जगताप यांना पाठींबा जाहीर केला.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजाप-शिवसेना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. १३) प्रभाग क्रमांक २६ वाकड-पिंपळेनिलख परिसरातील हौसिंग सोसायटीमधील पदाधिकारी व नागरिकांचा मेळावा घेण्यात आला. भाजप नगरसेवक संदिप कस्पटे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यात हौसिंग सोसायट्यांतील नागरिकांनी निवडणुकीत आमदार जगताप यांना पाठिंबा जाहीर केला.

या कार्यक्रमाला हौसिंग सोसायटीमधील सुमारे ६०० नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी व्यासपीठावर येऊन आपल्या भागातील समस्या मांडल्या व त्याचबरोबर झालेल्या कामांबद्दल कौतुक देखील केले. नगरसेवक संदिप कस्पटे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठपुराव्याने झालेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला. तसेच निवडणुकीत आमदार जगताप यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन केले.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच हौसिंग सोसायट्यांना सामोरे जावे लागलेल्या समस्या एक-एक करून सोडवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीला सामोरे जाताना आपली विकासात्मक भुमिका त्यांनी सर्वांपुढे मांडली. कस्पटेवस्ती येथील काळेवाडी फाट्याजवळच्या प्राधिकरणाच्या जागेत खेळाचे मोठे मैदान उभारण्याचा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल, असे त्यांनी सांगितले. हौसिंग सोसायट्यांमधील नागरिकांनी निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा जाहीर केला.

Visit : Policenama.com