महाशिवरात्री 2020 : महादेवाची पूजा करताना चुकूनही ‘शंखा’सह ‘या’ 7 गोष्टींचा वापर करू नका, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवभक्तांसाठी आपले आराध्य दैवत श्री भोलेनाथ यांना प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीचा सोहळा विशेष असतो. महाशिवरात्रीला शिवभक्ती केल्याने जीवनातील समस्या आणि ग्रहांशी संबंधित दोष दूर होतात. महाशिवरात्रीला भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी भक्त विविध प्रकारच्या वस्तू त्यांना अर्पण करतात. काहीवेळा नकळत भक्त अशी वस्तू अर्पण करतात ज्या शास्त्रात निषिद्ध मानल्या गेल्या आहेत.

शिवपूजेत शंख निषिद्ध
शिव उपासनेत शंखाचा वापर निषिद्ध मानण्यात आला आहे. यापाठीमागे एक पौराणिक कथा आहे. भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता, जो भगवान विष्णुंचा भक्त होता. शंखाला त्याच असुराचे प्रतीक मानले जाते. यासाठी शिवपूजेत शंख वापरू नये. तसेच पिंडीवर शंखाने जलाभिषेक करू नये. शंक वाजवू नये.

शिवलिंगावर तुळशीपत्र अर्पण करू नये
तुळशीला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. सर्व पूजाविधी, शुभकार्यात तुळशीचा वापर केला जातो, परंतु तुळस भगवान शंकराला अर्पण करणे शास्त्रानुसार अमान्य आहे. काही लोक नकळत भगवान शंकरांच्या पुजेत तुळशीचा वापर करतात, ज्यामुळे त्यांची पूजा पूर्ण होत नाही.

शिवलिंगावर तिळ अपर्ण करू नये
तिळ शिवलिंगावर अर्पण करणे अयोग्य आहे, कारण असे म्हटले जाते की तिळ भगवान विष्णुंच्या संबंधातून निर्माण झाले आहेत.

शिवलिंगावर तुकडा पडलेले तांदुळ अर्पण करू नये
भगवान शंकराला अक्षता म्हणजे तांदूळ अर्पण करण्याबाबत शास्त्रात लिहिले आहे. तुकडे पडलेला तांदूळ अपूर्ण आणि अशुद्ध असल्याने तो शंकराला अर्पण करत नाहीत.

कुंकूसुद्धा निषिद्ध
कुंकू सौभाग्याचे प्रतिक आहे, परंतु भगवान शंकर हे वैरागी आहे, यासाठी शंकराला कुंकू अर्पण करत नाहीत. तसेच शिवलिंगावर हळदसुद्धा अर्पण करू नये.

नारळाचा वापर करू नका
शिव आराधना करताना शिवलिंगावर नारळातील पाण्याने अभिषेक करू नका. नारळ हा देवी लक्ष्मीचे प्रतिक आहे. ज्यांच्या संबंध भगवान विष्णूंशी आहे.

सौभाग्याचे प्रतिक असलेल्या वस्तू
शिवपूजा करताना सौभाग्याशी संबंधित कोणत्याही वस्तू अर्पण करू नका.