Mahashivratri 2021 : विवाहात असेल बाधा किंवा एखादा जुना रोग, जाणून घ्या महादेवाच्या कोणत्या मंत्राने दूर होईल समस्या

नवी दिल्ली : हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीची उपासना केली जाते. या वर्षी हा दिवस 11 मार्च 2021 गुरुवारी आहे. या दिवशी अतिशय शुभ आणि कल्याणकारी शिवयोग होणार असून सोबतच मकर राशीत एकाच वेळी 4 मोठे ग्रह- शनी, गुरु, बुध आणि चंद्र असतील. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजाअर्चा करण्यासह उपवास केल्याने भक्ताला इच्छित फळ, धन, वैभव, सौभाग्य, सुख-समृद्धी, आरोग्य, संतती इत्यादी प्राप्ती होते. महाशिवरात्री एक असा उत्सव आहे जो देशाच्या प्रत्येक कोपर्‍यात साजरा केला जातो. हा उत्सव भगवान शंकर आणि पार्वती मातेच्या मिलनाचा महाउत्सव समजला जातो.

महाशिवरात्रीला मंत्रांनी करा महादेवाला प्रसन्न
महादेवाला भोलेनाथ म्हटले जाते. कारण ते शिवलिंगावर अर्पण केलेले एक पात्र जल किंवा अक्षतांच्या चार दाण्याने सुद्धा प्रसन्न होतात. शिवलिंगावर जल अर्पण करणे आणि बेलपत्र चढवल्यानंतर जर तुम्ही पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून या मंत्रांचा जप केला तर इच्छित फलप्राप्ती होऊ शकते, कारण भगवान शंकरांना हे मंत्र अतिशय प्रिय आहेत. ते मंत्र आहेत :
– ओम नमः शिवाय
– ओम नमो वासुदेवाय नमः
– ओम राहुवे नमः

महामृत्युंज्य मंत्र
ओम त्र्यंम्बकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं!
उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीय मामृतात!!

महाशिवरात्रीला विविध समस्यांसाठी या मंत्रांचा जप करा

* आयुष्य वृद्धीसाठी – शं हृीं शं !!
* विवाहातील अडचण दूर करण्यासाठी – ओम ऐं हृी शिव गौरी मव हृीं ऐं ओम!
* शत्रुवर विजय प्राप्त करण्यासाठी – ओम मं शिव स्वरुपाय फट् !
* एखादा जुना आजार दूर करण्यासाठी – ॐ हौं सदाशिवाय रोग मुक्ताय हौं फट् !
* शनीच्या साडेसातीसाठी – हृीं ओम नमः शिवाय हृीं !
* एखादी केस, खटल्यातून सुटका होण्यासाठी – ओम क्रीं नमः शिवाय क्रीं !
* परीक्षेत यश मिळवण्यासाठी – ओम ऐं गे ऐं ओम !
* बिघडलेल्या संततीला पुन्हा योग्य मार्गावर आणण्यासाठी – ओम गं ऐं ओम नमः शिवाय ओम !
* परदेश प्रवासासाठी इच्छूक लोकांसाठी – ओम अनंग वल्लभाये विदेश गमनाय कार्यसिद्धयर्थे नमः!
* सुख संपदा मिळवण्यासाठी – ओम हृौं शिवाय शिवपराय फट् !
* रोजगार किंवा नोकरीसाठी – ओम शं हृीं शं हृीं शं हृीं शं हृीं ओम !
* प्रेमप्राप्तीसाठी – ओम हृीं ग्लौंअमुकं सम्मोहय सम्मोहय फट्!