MahaTET Exam Scam Case | टीईटी पेपरफुटी प्रकरण ! प्रीतीश देशमुखचा वर्ध्यात राजवाडा, कोट्यवधींची जमवली माया

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – MahaTET Exam Scam Case | टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आरोपी जी ए सॉफ्टवेअरचा (GA Software Technologies Pvt Ltd) डॉ. प्रीतीश देशमुख (Dr. Pritish Deshmukh) याने वेगवेगळ्या परीक्षांमध्ये गैरव्यवहार (MahaTET Exam Scam Case) केल्याचे समोर आले आहे. या सर्वांमध्ये काही वरिष्ठही सहभागी होते. आतापर्यंतच्या तपासात आरोग्य, म्हाडा, टीईटीबरोबर आणखी काही परीक्षांच्या पेपरमध्ये प्रीतीशनं घोटाळे केले असून त्या माध्यमातून कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. एवढेच नाही तर वर्धा (Wardha News) येथे त्याचा ‘राजवाडा’ नावानं आलिशान बंगला असल्याचे समोर आले आहे.

 

मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील (Budhana) असलेले हे देशमुख कुटुंब वर्ध्यात नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झाले. डॉ. प्रीतीश याचे वडील गणित विषयाचे प्राध्यापक आहेत जे नुकतेच निवृत्त झाले आहेत. शहरातील सेवाग्राम मार्गावर स्नेहलनगर येथे देशमुखचा बंगला आहे. त्याला राजवाडा असे नाव दिले आहे. बंगल्यासमोरील तब्बल 8 हजार स्क्वेअरफूट जागा खरेदी केल्याचीही चर्चा आहे. याठिकाणी आई वडील राहतात तर प्रीतीश 2 महिन्यातून एकदा या ठिकाणी येतो 10 दिवस राहिल्यानंतर तो पुन्हा पुण्याला जातो. त्याने इतक्या कमी कालावधीत कोट्यवधीची माया जमवल्याचे परिसरातील लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. दरम्यान, प्रीतीशला राजकारणात खूप रस असून त्याने एका नेत्याला विधानपरिषदेचे आमदार बनायची इच्छा बोलून दाखवली होती. अशी माहिती तपासात समोर आली आहे. (MahaTET Exam Scam Case)

देशमुखच्या कार्यालयाकडून 23 हार्ड डिस्क, 1 सीम कार्ड, 41 सी डी, 1 फ्लॉपी डिस्क व इतर कागदपत्रे मिळाली असून,
घर झडतीमध्ये माबाईल, 1 लॅपटॉप, 4 पेनड्राईव्ह, इतर कागदपत्रे मिळाली आहेत.
वेगवेगळ्या परीक्षांच्या उमेदवारांच्या याद्या डॉ. देशमुख, अंकुश हरकळ (Ankush Harkal), संतोष हरकळ (Santosh Harkal)
या आरोपींकडून मिळाल्या आहेत. यातील संतोषकडे असलेल्या लॅपटॉपमध्ये काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे.
त्या माहितीचे विश्लेषण करण्यात येत असून आणखी काही एजंटांची आणि परीक्षार्थ्यांची माहिती समोर येण्याची शक्यता तपासी अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

 

Web Title :- MahaTET Exam Scam Case | paper leak case desire become mla pritish deshmukh builds rajwada vardha

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लाईट तोडल्याच्या रागातून ग्राहकाचा दापोडीमधील महावितरण कार्यालयात राडा, भोसरी पोलीस ठाण्यात FIR दाखल

Instant Quick Online Loan | ‘इन्स्टंट लोन’ घेण्यापुर्वी ‘या’ गोष्टींकडे लक्ष दिल्यास तात्काळ होईल तुमचं काम, जाणून घ्या

 

ST Workers Strike | संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाचा दणका, बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यास नकार