क्रांतिकारी पुरोगामी चळवळीचे प्रवर्तक ‘महात्मा बसवण्णा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लिंगायत हे बाराव्या शतकातील एका धर्मसुधारणेच्या व समाज सुधारणेच्या आंदोलनाचे नाव आहे. त्या क्रांतिकारी पुरोगामी चळवळीचे प्रवर्तक व अध्वर्यु आहेत म. बसवण्णा.मी.बसवण्णांचा जन्म बाराव्या शतकातील कळचुर्य घराण्याच्या मंगळवेढा राज्यातील बागेवाडी जिल्हा. विजापूर येथे झाला. आईचे नाव होते मादलांबिका आणि वडील मादिराज.

बागेवाडीच्या जीवनात असाच एक शुभ दिवस उगवला .इ.स.1105 मधील वैशाख शुद्ध तृतीया,रोहीणी नक्षञावर अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी मादिराज आणि मादलांबिकेच्या पोटी पुत्र रत्न झाले. या बाळाचे बसवअसे नाव ठेवले. पुढे हाच बसव समतायुगाचा द्रष्टा प्रारंभकर्ता म. बसवणा म्हणून जगापुढे आला.

म. बसवणा नी चातुर्वर्ण्य, अस्पृश्यता, स्त्री पुरुष भेद,कर्मसिद्धांत, अनेक देवतोपासना,पंचसुतके इ. फोल ठरवली. तळहातावरील परशिवप्रतिक इष्टलिंगाची उपासना करण्याच्या सुलभ‌ भक्ती प्रकाराचे समर्थन‌ केले. स्त्रियांना दिक्षा देवून लिहीणे. वाचणे शिकवून वचन लिहिण्यास सक्षम केले.श्रम केल्यानेच पृथ्वी वर‌ स्वर्ग अवतरतो. म्हणुन कायक दासोहाचे समर्थन केले. अनुभव मंटप या सांस्कृतिक केंद्राची उभारणी केली. लोकभाषेचा पुरस्कार केल्याने वचन साहित्य बाराव्या शतकात निर्माण झाले. मानवतावादी विचार, तत्त्वे केवळ व्यक्त न करता प्रत्यक्ष कृतीत, आचरणात आणू न दाखविले.

जगदगला मुीगीलगला मेगे आगला निम अगला आकाश दिनद अतत्ता निम्म श्री मुकुटा पाताळ दिनद अतत्ता निम्मा श्री चरणा अगम्या अगोचरा अप्रतिम अप्रमाण लींगवे कुडलसंगम देवा यंना करस्थल के बंदु चुळकआदिरय्‍या

बसवण्णांनी देवाच्या स्वरूपाचे वर्णन केले आहे जगाच्या आकाशाच्या ढगाच्या ब्रह्मांडाच्या वरती तुमचे श्री मुकुट आहे आणि पाताळाचा ही खाली तुमचे श्रीचरण आहे तुमचे स्वरूप अगम्य अगोचरः अप्रतिम अप्रमाण आहे एवढे मोठे स्वरूप असतानासुद्धा माझ्या कल्याणासाठी लिंग होऊन माझ्या हातावर येऊन येऊलीसे लहान झालात कुडलसंगम देवा

या वचनांमधून आपण काय बोध घेतला पाहिजे परमेश्वराचे स्वरुप खूप मोठे आहे त्याला जाणायचं आत्मसात करायचा असेल तर लिंग योग करायला पाहिजे कारण ती चैतन्य शक्ती आहे ती कुणाच्या डोळ्याला दिसणार नाही जेव्हा तुम्ही लिंग योग करतांना सम्‍यक दृष्‍टीने एक टक पाहणेही सुद्धा एक साधना आहे त्याच्यावर आपली अपार श्रद्धा पाहिजे लिंग योग करता करता ही शांतीची अनुभूती होते ती परमेश्वरी शांती आणि योग करता करता काही क्षणासाठी आपण आपणास विसरून जातो त्‍यालाच लिगांग सामरस्‍य असे म्‍हणतात आपण शरीर आहोत हे अनुभूती राहत नाही त्यालाच लिंग सामरस्य असे म्हणतात तेव्हा आपण आत्मलींगा मधे एकाकार होतो ती खरी अनुभूती आहे.की त्या चैतन्याची अनुभूती होईल कारण आपली चैतन्यशक्ती जी आहे ती तुमच्या प्रत्येक कार्याचा द्रष्टा आहे आणि तुमच्या प्रत्येक कार्यात मदत करते आणि तुम्हाला चांगला आहे की वाईट आहे हे सांगत असते ऐकायचं तुमच्या हातात आहे म्हणून बसवण्‍णा आपल्या एका वचनात म्हणतात

मनेयोळग मनेयोडे यनिद्‍दानो इल्‍लवो
होस्‍तीलल्‍ली हुल्‍लु हुट्‍टी मनेयोळग रज तुंबी
मनेयोळग मनेयोडेयनिद्‍दानो इल्‍लवो
तनुवीनल्‍ली हुसी तुंबी मनदोळग विषय तुंबी
मनदोळग मनदोडेयनिद्‍दानो इल्‍लवो
ईल्‍ल

घरामध्‍ये घराचा मालक आहे का नाही बाहेर घराच्या साफसफाई नसल्यामुळे दरवाजासमोर गवत उगवलं आहे घरात कचरा जमा झाला आहे घरामध्ये घराचा मालकआहे का नाही घरामध्‍ये घराचा मालक नसेल तर परिस्थिती काय होईल आपण सर्वांना माहीत आहे हा झाला लोकांनुभव सर्वांना माहीत आहे व सर्वांना कळते पुढे बसवण्‍णा आपल्या वचनांमध्ये शिवा अनुभव सांगतात हा शिवा अनुभव खूप महत्त्वाचा आहे.

आपण प्रत्येक वचनांमध्ये बारकाईने बघितले तर पहिले लोकांनुभव त्याचा अर्थ लोकांच्या रोजच्या जीवनात जे चालते ते आणि शेवटच्या ओळी मध्ये शिवा अनुभव आहे कविता आणि वचनामध्ये हा फरक आहे कविता संगीत आपणास आनंद देतात आणि बसवण्‍णांचे वचन आपणास जीवन जगण्याची कला शिकवतात शिवा अनुभव मध्ये बसवण्‍णा सांगतात तनुविनल्‍ली हुसी तुंबी मनदल्‍लि विषय तुंबी मनदोळग मनदोडेयनिद्‍दानो इल्‍लवो देहामध्ये असत्या साचले मनामध्ये विषय साचले मनामध्ये मनाचा मालक मनाचा स्वामी आहे का नाही हा विषय आपण खूप गांभीर्‍याने समजून घेतला पाहिजे कारण मनामध्ये मनाचा मालक चैतन्यशक्ती आहे आणि आपण कुठलीही गोष्ट करताना स्वतःला प्रश्न विचारून ही गोष्ट करावी त्या मनाचे न ऐकता त्या मनाचा जो मालक आहे त्याच्यामुळे जीवनामध्ये आपल्याला किंमत आहे.

त्याच्यामुळे आपण सर्व कार्य करतो त्या मनाच्या मालकाचे ऐकावे त्याच्या ऐकले तर आपले तन शुद्ध मन शुद्ध आणि चांगले जीवन होईल मनाचा मालक जर नसेल तर आपल्या शरीराला काही किंमत नाही याचा अर्थ मृत्यू मरण आल्‍यानंतर आपल्याला एक दिवसही घरात कोणी ठेवून घेणार नाही मनामध्ये मनाचा मालक याचा अर्थ सूक्ष्म स्वरूपात आपल्यामध्ये जी चैतन्यशक्ती आहे ते त्याचे दर्शन घेण्यासाठी मनुष्य सगळीकडे भटकत आहे तो परमात्मा आपल्यामध्येच आहे लिंग योग केल्याने याची आपणास जाणीव होते हेच या वचनांमधून बसवण्‍णांनी सांगितले आहे.

बी. एस. पाटील ( हेरवाडकर )
जयसिंगपूर
राज्य सरचिटणीस,
लिंगायत धर्म महासभा महाराष्ट्र राज्य
89755 21520