महात्मा गांधी यांचे पणतू सतीश धुपलिया यांचे ‘कोरोना’च्या संसर्गाने निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिका वंशाचे महात्मा गांधी यांचे पणतू सतीश धुपलिया यांचे रविवारी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झाले. ते 66 वर्षांचे होते आणि तीन दिवसांपूर्वी त्यांचा वाढदिवस होता. त्यांच्या कुटुंबातील सदस्याने ही माहिती दिली.

कोविड 19 संसर्गामुळे मृत्यू झाल्याची पुष्टी धुपलियाची बहीण उमा धुपलिया-मेस्थारी यांनी केली. त्यांनी सांगितले की, त्यांच्या भावाला न्यूमोनिया झाला होता आणि ते उपचारांसाठी एक महिन्यासाठी रुग्णालयात होते आणि तेथे त्यांना संसर्ग झाला.

त्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाल्या की, “माझ्या प्रिय भावाचे न्यूमोनियामुळे एक महिना ग्रस्त झाल्यानंतर निधन झाले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांना कोविड 19 चा संसर्ग झाला होता. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्या म्हणाल्या की, “त्यांना आज संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला.” त्यांच्या कुटुंबात उमा आणि कीर्ती मेनन या दोन बहिणी आहेत, ज्या तिथेच राहतात.

हे तीन भावंडे मनिलाल गांधी यांचे वारस आहेत, ज्यांना महात्मा गांधी आपले कार्य पूर्ण करण्यासाठी भारतात परतण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत सोडून आले होते. धुपलिया यांनी आपले आयुष्य माध्यमात विशेष करून व्हिडिओग्राफर आणि छायाचित्रकार म्हणून घालवले. ते गांधी डेव्हलपमेंट ट्रस्टसाठी सक्रियपणे कार्यरत होते.