पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या 6 विद्यार्थ्यांना महात्मा गांधी विद्यापीठाने केलं निलंबित

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – कांशीराम जंयतीनिमित्त कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणाऱ्या ६ विद्यार्थ्यांना महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने निलंबित केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे सर्व विद्यार्थी स्त्री अध्ययन विभागातील आहेत. निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्यामुळे ही कारवाई केल्याचा खुलासा विद्यापीठाने केला आहे. कार्यकारी कुलसचिव डॉ. राजेश्वर सिंह यांनी ही कारवाई केली.

आंदोलक विद्यार्थी

देशातील ५० मान्यवरांनी पंतप्रधानाना देशातील परिस्थितीवर पत्र लिहिल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. येथे ६ विद्यार्थ्यांना थेट निलंबित करण्यात आले आहे.महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ परिसरात कांशीराम यांची जंयती साजरी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे परवानगी मागितली होती़ मात्र त्यांना ती परवानगी नाकारण्यात आली. तरीही अनेक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन निदर्शने केली.

पत्रं

प्रशासनाने त्याना मज्जाव केल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी विद्यार्थ्यांना हुसकाविण्यास सुरुवात केली. त्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी विद्यार्थ्यांनी केली. त्यातच विद्यापीठातील वसतीगृहात विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने सामुहिकपणे पत्र लिहिले. त्यांना देशातील सध्यस्थिती व काश्मीर प्रश्नाचा या पत्रात उल्लेख करण्यात आला. विद्यार्थ्यांची कशी मुस्कटदाबी करण्यात येत आहे, याची माहिती या पत्रात देण्यात आली. यानंतर विद्यार्थी गुरुवारी रात्री उशिरा वसतीगृहात परतले. दरम्यान, विद्यार्थी प्रशासनाने मध्यरात्री संकेतस्थळावर ६ विद्यार्थ्यांवर कारवाई केल्याचे पत्र प्रसिद्ध केले. त्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे उल्लंघन तसेच न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा ठपका विद्यार्थ्यांवर ठेवण्यात आला आहे.

विद्यापीठ प्रशासनाचं पत्र
यावर विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचा कारभार नेहमीच हुकुमशाही पद्धतीचा राहिला आहे. कारवाई करताना आमचे मतही विचारात घेतले नाही. मध्यरात्री कारवाई करणे कितपत योग्य आहे. ही कारवाई बेकायदेशीर आहे. विद्यमान स्थितीवर चिंता व्यक्त करीत पंतप्रधानांना पत्र लिहिण्याची बाब गुन्हा ठरु शकत नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने परवानगी मागितली होती.

 

Visit : Policenama.com