Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana (MJPJAY) | महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत आवश्यक उपचारांचा समावेश करणार – आरोग्यमंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana (MJPJAY) पडताळणी करून या योजनेत मनोविकाराच्या अन्य आजारांसहित आवश्यक असणाऱ्या अन्य आजारांचा समावेश केला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana (MJPJAY)

महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेत डिप्रेशन, डिसअसोसिएटिव्ह डिसऑर्डर, एंग्झायटी डिसऑर्डर आणि डिमेंशिया या मनोविकार आजारांचा समावेश करावा, याबाबत सदस्य निरंजन डावखरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana (MJPJAY)

आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेत मनोविकाराकरिता एकूण पाच उपचारांचा समावेश केलेला आहे. राज्यातील अंगीकृत शासकीय रुग्णालयातून या उपचाराचा लाभ या योजनेंतर्गत दिला जातो.

मनोविकार रुग्णांना आरोग्य विमा आणि ग्रुप विमा देणाऱ्या कंपन्या ह्या इन्शुरन्स रेग्युलेटरी ॲण्ड डेव्हलपमेंट (IRDA) या संस्थेच्या अखत्यारित येतात. ही संस्था केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. २३ सप्टेंबर २०१८ पासून आजपर्यंत एकूण २०९१ रुग्णांनी या उपचाराचा लाभ घेतलेला असून दाव्यांकरिता रुपये १ कोटी ३ लाख ९९ हजार ९८७ रूपये एवढी विमा कंपन्याद्वारे संबधित रुग्णालयांना अदा करण्यात आली आहे, असेही मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची पडताळणी करण्यासाठी
समिती नेमण्यात येईल. या योजनेत समावेश असलेल्या कोणत्या योजनांवर खर्च होत नाही हे
समिती मार्फत तपासून पाहिले जाईल. पुन्हा नव्याने आवश्यक त्या उपचारांचा यामध्ये समावेश करण्यात येईल,
असेही आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.

सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर (Pravin Darekar) , अनिकेत तटकरे (Aniket Tatkare),
उमा खापरे (Uma Khapre), गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)
यांनी या संदर्भात उपप्रश्न उपस्थित केले.

Web Title : Pradhan Mantri Jan Arogya Yojana along with Mahatma Jyotirao
Phule Jan Arogya Yojana will include necessary treatment – Health
Minister Prof. Dr. Tanaji Sawant

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Awas Yojana | प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुले पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य

Dr. Tanaji Sawant | बंधारे बांधून तीनशे हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार – डॉ. तानाजी सावंत