महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन : कविसंमेलन अध्यक्षपदी सागर काकडे यांची निवड

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित १३ व्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या कविसंमेलन अध्यक्षपदी प्रसिद्ध युवा कवी सागर काकडे यांची निवड करण्यात आली आहे. हे साहित्य संमेलन शुक्रवारी (दि. २७ नोव्हेंबर २०२०) महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी, पुणे येथे पार पडणार आहे.

कवी सागर काकडे हे गेली सात वर्षे साहित्य क्षेत्रात कार्यरत असून, त्यांचा माणसाच्या सोयीचा देव हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. या संग्रहास अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत; तसेच संपूर्ण महाराष्ट्रात शेकडो कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कवितेतून लोकांचे प्रबोधन केले आहे, अशी माहिती परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर यांनी दिली आहे. या बैठकीत राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे आणि महाराष्ट्रातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते.

You might also like