महात्मा फुले सत्यशोधक पुरस्कार ह.भ.प. सखाराम लांडगे यांना जाहीर

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन

चंद्रकांत चौंडकर सासवड ( ता. पुरंदर ) येथील श्री स्वामी समर्थ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ,श्री काळ भैरवनाथ ट्रस्टचे माजी कार्याध्यक्ष, संत शिरोमणी सावता महाराज दिंडीचे संस्थापक अध्यक्ष, नगरपालिका म. फुले स्मारक समितीचे माजी अध्यक्ष, पुरंदर तालुका ओबीसीचे माजी अध्यक्ष व सासवड नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष अशा अनेक पदाच्या माध्यमातुन सामाजिक कार्य केल्या बद्दल ह.भ.प. सखाराम नारायण लांडगे यांना महात्मा फुले सत्यशोधक पुरस्कार जाहिर जाहिर करण्यांत आला असल्याची माहिती महात्मा फुले विचार अभियान आदर्की ( ता. फलटण ) चे संयोजक अजित जाधव यांनी दिली.

११ मे रोजी खानवडी ( ता. पुरंदर ) येथे सकाळी ११ वाजता महात्मा फुले यांचे स्मारकात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सुधाकर गिरमे, रामभाऊ वढणे, नाना लांडगे, नंदकुमार दिवसे, अरविंद म्हेत्रे, सुधाकर बोरावके, चंद्रकांत टिळेकर, अशोक लांडगे, अनिल लांडगे, राजाभाऊ जगताप, सदानंद शेट्टी, आदींनी  सखाराम लांडगे यांचे अभिनंदन केले आहे.