Mahatma Phule Shetkari Sanman Yojana | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! लवकरच 50 हजारांचे अनुदान खात्यात येणार; अजित पवारांची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mahatma Phule Shetkari Sanman Yojana | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
राज्यातील नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारांपर्यंतचे अनुदान देण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे.
यानुसार पात्र शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाकडे (Department of Co-Operation) देण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहे.
याबाबत अधिकृत स्पष्टता आल्यानंतर संगणकीय प्रणाली पूर्ण होऊन पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेमध्ये (Mahatma Phule Shetkari Sanman Yojana)
नियमित पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाची घोषणा करतानाच यावर्षी महिला शेतकरी आणि शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा अजित पवार यांच्याकडून करण्यात आली होती.
दरम्यान, अनुदानाच्या सर्व बाबी लवकरच पूर्ण होणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर पैसे जमा होणार आहेत.
नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी बँकांनी पाठवली असल्याने आगामी 2 आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीच्या लाभासंदर्भात अभ्यास करण्यासाठी यापूर्वीच काही मंत्र्यांची उपसमिती स्थापन केली आहे.
नियमित कर्जदारांना 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देताना कोणत्या वर्षांतील आणि कोणत्या शेतकऱ्यांना तो लाभ द्यायचा,
याचाही अभ्यास ही समिती करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत थकबाकीत नसलेल्या नियमित कर्जदारांनाच हा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, डॉ. पंजाबराव देशमुख (Dr. Punjabrao Deshmukh) व्याज सवलत योजनेमुळे पीक कर्ज वाटपात वाढ झाली असून फेब्रुवारी अखेर 41 हजार 55 कोटी रुपये कर्जाचे वाटप झाले आहे.
त्यामुळे या आर्थिक वर्षांमध्ये 911 कोटी रुपयांचा उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा सुमारे 43 लाख 12 हजार शेतकऱ्यांना लाभ होईल, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

 

Web Title :- Mahatma Phule Shetkari Sanman Yojana | good news for farmers is that a grant of rs 50000 will be credited to the account soon Mahatma Phule Shetkari Sanman Yojana

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा