महावीर विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) –  येथील श्री महावीर विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण माजी आमदार अनिल कदम यांच्या शुभ हस्ते पार पडले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान लासलगाव कृ.उ.बा.समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर यांनी भूषविले.

याप्रसंगी माजी आमदार अनिल कदम यांनी राष्ट्राला वंदन करणे या देशात जन्मलेल्या सर्वांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. सर्वांनी मिळून बलशाली भारत घडवूया असे प्रतिपादन केले. तसेच संस्थेच्या शैक्षणिक प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विद्यालयाचा माजी विद्यार्थी यश संदीप पाटील याची नासा येथे होणाऱ्या वर्कशॉपसाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच प्रा. प्रमोद कदम यांच्या हस्ते विद्यालयास स्पर्धा परीक्षांचे पुस्तके भेट देण्यात आले. मिलिंद गायकवाड यांनी विद्यालयास भारतीय संविधानाची प्रत भेट दिली.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून निफाड पं.स.चे उपसभापती शिवा सुरासे, डॉ.श्रीधर दायमा, प्रसिध्द व्यापारी अनिल आब्बड, विनोद लोढा, प्रफुल्ल ब्रम्हेचा, जितेंद्र जांगडा, महेश पाटील, कृ.उ.बा.समितीचे माजी उपसभापती ललित दरेकर, सतीष अहिरे, प्रसिध्द व्यापारी मनोज भावसार, मनोज रेदासनी, प्रा.चोरडिया, तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रम्हेचा, मानद सचिव श्री शांतीलाल जैन, श्री महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनील आब्बड, जैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे अध्यक्ष महावीर चोपडा, आय.टी.आय. चे अध्यक्ष मोहन बरडिया, संस्थेचे विश्वस्त अजय ब्रम्हेचा, अमित जैन, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष ब्रम्हेचा, सदस्य राहुल बरडिया, दर्शन साबद्रा, अजित आब्बड, माजी प्राचार्य पी.एच.पाटील, माजी पर्यवेक्षक सी.एस.पाटील, विद्यालयाचे प्राचार्य दिलीप डुंगरवाल, जैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे मुख्याध्यापिका नलिनी शिंदे, आय.टी.आयचे प्राचार्य साहेबराव हांडगे, वसतिगृहाचे व्यवस्थापक धनपाल कोल्हापुरे, पर्यवेक्षक मधुकर बोडके, कार्यालयीन अधीक्षक रवींद्र जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दिलीप डुंगरवाल यांनी केले. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन विभाग प्रमुख कैलास भारती यांनी केले. झेंडागीत व देशभक्तीपरगीत विद्यालयाचे संगीत शिक्षक सचिन आहेर व गीतमंचाने सादर केले. याप्रसंगी श्री महावीर जैन विद्यालय या संस्थेतील सर्व शाखांतील विद्यार्थ्यांनी विविध देश भक्तीपर कार्यक्रम सादर केले. एन.सी.सी.संचलन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.सी.सी.शिक्षक राजेंद्र बनसोडे व उपशिक्षिका लीनिता अहिरे यांनी केले. आभार प्रदर्शन जैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे अध्यक्ष महावीर चोपडा यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व शाखांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली

फेसबुक पेज लाईक करा –