शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आम्हाला जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिला आहे त्यामुळे आम्ही विरोधात बसणार असा निर्णय विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार यांनी घेतला होता. मात्र त्यानंतर राज्यात मोठे सत्तानाट्य झाले आणि शरद पवार याच्या केंद्रस्थानी होते. भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद झाला त्यानंतर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना ही तीनही जवळ येऊ लागले.

मात्र अचानक अजित पवार यांनी भाजपशी हात मिळवणी केली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली त्यानंतर काही तासातच शरद पवार यांनी अजित पवारांचे बंड मोडून काढले. त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपत घेतली. त्यासोबतच तीनही पक्षातील इतर दोन दोन मंत्र्यांनी देखील मंत्री पदाची शपत घेतली.

तीनही पक्षांचे सरकार जास्त काळ टिकणार नाही असे जरी विरोधक म्हणत असले तरी या सत्ता समीकरणाच्या केंद्रस्थानी शरद पवार असल्यामुळे हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल अशी आशा तीनही पक्षांना वाटते. मात्र सध्या चर्चा आहे ती कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार याची. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यासाठी आता एक नवीन तारीख समोर आली आहे.

ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार १२ डिसेंबर रोजी म्हणजेच शरद पवारांच्या जन्म दिवशी होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यामुळे कोणाला कोणते खाते मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like