×
Homeताज्या बातम्याMahavikas Aghadi वंचित बहुजन आघाडीबरोबर युतीसाठी राष्ट्रवादी तयार?, अजित पवारांचे मोठे विधान;...

Mahavikas Aghadi वंचित बहुजन आघाडीबरोबर युतीसाठी राष्ट्रवादी तयार?, अजित पवारांचे मोठे विधान; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपविरोधी लढ्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) कडून नियोजनबद्ध पावले टाकली जात आहेत. त्यांनी त्यांच्या महाविकास आघाडीत जमतील तितके पक्ष सहभागी करून घेण्याचा निश्चय केला असून त्यांच्या राजकीय विचारसरणीशी जुळणाऱ्या सर्व पक्षांकडे महाविकास आघाडी प्रवेशाबद्दल विचारणा केली आहे. या यादीत प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष होते. प्रकाश आंबेडकरांनीही महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) येण्याचे संकेत दिले आहेत.

 

प्रबोधनकार डॉट कॉम संकेतस्थळाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे एकाच मंचावर असणे, त्याच दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. ‘देशात लोकशाही टिकवण्यासाठी, स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी केवळ लोकांना जागे करणे पुरेसे नाही. तर, त्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आता आली आहे. देश गुलामगिरीकडे चालला असताना आपण नुसते बघत राहिलो तर मला आजोबांचे नाव घेण्याचा अधिकार राहणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांबरोबर नवीन राजकीय समीकरणाचे संकेत दिले.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या संबंधी काय भूमिका घेते हे पाहणे ही महत्वाचे होते.
त्या संदर्भात अजित पवारांनी मोठे विधान केले आहे. मतांची विभागणी टाळण्यासाठी समविचारी पक्षांबरोबर येण्यास आम्ही तयार आहोत.
मात्र, ही तयारी दोन्हीबाजूने असली पाहिजे. राज्यात आंबडेकर गट, गवई गट, कवाडे गट, आठवले गट आहेत.
यातील अनेकांबरोबर आघाडी (Mahavikas Aghadi) करून आम्ही निवडणुका लढल्या आहेत.
रामदास आठवले हे केंद्रात मंत्री होण्यापूर्वी आमच्याबरोबर आघाडी असायची.
आर आर पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर चर्चा केली होती.
त्यामुळे आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत,” असे अजित पवारांनी स्पष्ट केले.

 

Web Title :- Mahavikas Aghadi | ajit pawar will discuss prakash ambedkar on mahavikas aghadi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aditya Thackeray | आदित्य ठाकरे तेजस्वी यादव भेटीत कोणत्या विषयावर चर्चा?, आदित्य ठाकरे म्हणाले…

Jalna ACB Trap | जमीन नावावर करुन देण्यासाठी 10 हजाराची लाच घेणारा तलाठी लाच लुचपत विभागाच्या ताब्यात

MP Bhavana Gawali | अकोल्यातील गोंधळावर खासदार भावना गवळींनी केली तक्रार दाखल;
खा. विनायक राऊत आणि आ. नितीन देशमुख यांनी चिथावल्याचा आरोप

Must Read
Related News