Mahavikas Aghadi Government | महाविकास आघाडीचे सरकार राहणार की कोसळणार ?; शरद पवार इन अ‍ॅक्शन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mahavikas Aghadi Government | विधान परिषदेच्या निकालानंतर (Maharashtra Vidhan Parishad Election) राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील जवळपास 25 आमदार देखील असल्याची माहिती आहे. गुजरातच्या सुरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये (Meridian Hotel in Surat) एकनाथ शिंदे असल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर गुजरातमधील भाजपा नेत्यांचा गट एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी हॉटेलच्या दिशेने रवाना झाल्याचे म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रातूनही काही शिवसेना नेते सुरतकडे रवाना झाल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. (Mahavikas Aghadi Government)

 

राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) दिल्लीला जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र राज्यातील या घडामोडी पाहाता संजय राऊत यांनी दिल्ली दौरा रद्द केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी देखील महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi Government) नेत्यांची तातडीची बैठक बोलावल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंची नाराजी कशी दूर करता येईल, महाविकास आघाडी सरकार कसं वाचवता येईल, याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

काल झालेल्या निकालामध्ये महाविकास आघाडीला धक्का देत भाजपने (BJP) आपले पाचही उमेदवार निवडून आणले आहेत. त्या दरम्यान काँग्रेसच्या एका उमेदवाराचा पराभव झाला आहे. शिवसेना आणि काँग्रेसमधील मतं फुटल्याने याचा फटका महाविकास आघाडीला बसला आहे. अशातच कालपासून एकनाथ शिंदेंनी मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

 

काय म्हणाले बाळासाहेब थोरात ?

“अडीच वर्ष सत्तेत राहूनही पक्षाची मतं फुटत असतील तर सरकार म्हणून आम्हाला विचार करण्याची गरज आता आहे.
आपल्याच पक्षाची मतं जर फुटत असतील तर दुसऱ्यांना दोष देऊन काय उपयोग ? इतरांना दोष देण्याचा मुद्दाच नाही.
आम्हालाच आता विचार करण्याची गरज आहे.
अडीच वर्ष सत्तेत राहूनही जर आमदारांमध्ये नाराजी असेल तर नेमकं कुठं चुकतंय याचा विचार करण्याची गरज असल्याचं,” काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले आहेत.

 

Web Title :- Mahavikas Aghadi Government | ncp chief sharad pawar called an emergency meeting of leaders of mahavikas aghadi government

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा