‘महाविकास’चे सरकार गेंड्याच्या कातडीचे : चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  ठाकरे सरकारमुळे राज्यातील वनवासी बांधवांच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सरकारने या समस्यांचे निराकरण करण्याकडे कायमच कानाडोळा केला आहे, असे म्हणत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे, असा हल्लाबोल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

भोसरी येथे जनजाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला विविध पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमुळे राज्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या समस्या शोधून आंदोलने करायला हवेत. आज या घडीला राज्याच्या वसतीगृहातील अवस्था भीषण आहे. वनवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करण्यात येतात मात्र त्यातही सावळा गोंधळ सुरू आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे काही जणांनी सरकारी नोकऱ्यांचा लाभ मिळवला आहे. पण सरकारला या सर्व विषयांबद्दल काही एक देणेघेणे नाही असे ते म्हणाले.

ठाकरे सरकार मालखाऊ : फडणवीस

भाजपच्या काळात आदिवासींसाठी केलेल्या कल्याणकारी योजना बंद करण्याचा घाट सध्याचे ठाकरे सरकार घालत आहेत. थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर आम्ही पैसे जमा करीत होतो. मात्र, सध्याच्या सरकारला खरेदीचा शौक आहे. कारण माल खरेदी केल्यास त्यांना माल मिळतो अशी कडवट टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.