×
Homeताज्या बातम्याMahavikas Aghadi Government | भाजपचे 'ऑपरेशन लोटस' यशस्वी न होण्यामागे 'ही' आहेत...

Mahavikas Aghadi Government | भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी न होण्यामागे ‘ही’ आहेत कारणे

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) आज 28 नोव्हेंबरला दोन वर्षे पूर्ण झाली. नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) एकत्रित येऊन सत्ता स्थापन झाली. भाजपसाठी (BJP) हा मोठा धक्का होता. त्या दिवसांपासून भाजपने महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) पाडण्याचा निश्चय केला. मात्र, आज दोन वर्ष होत आली तरी अद्यापही सरकार पाडण्यात भाजपला काही यश मिळाले नाही. वारंवार भाजपकडून नवीन तारखा जाहीर केल्या जातात. पण, होत मात्र काहीच नाही महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसच्या (BJP Operation Lotus) अनेकवेळा चर्चा रंगल्या पण राज्यात ऑपरेशन लोटस यशस्वी होऊ न शकल्याची काही ठरावीक कारणे आहेत.

 

भाजपाविरोधी राजकारण

 

देशात काही दशकांपूर्वी बिगर काँग्रेस राजकारण सुरु होते. आता तेच राजकारण भाजपच्या बाबातीतही होत आहे.
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे परंपरागत भाजपविरोधी पक्ष. आता त्यांना शिवसेनाही जाऊन मिळाली आहे.
एकूणच भाजपला सत्तेत येऊ न देण्यासाठी तिन्ही पक्षांनी चांगली कंबर कसली आहे. एकमेकांची साथ सोडल्यास त्याचा फायदा भाजपला होणार हे नक्की.
त्यामुळेच कितीही मतभेद झाले तरी महाविकास आघाडी मोडायची (Mahavikas Aghadi Government) नाही किंवा फूट पडू द्यायची नाही, याची खबरदारी तिन्ही पक्षांकडून घेतली जात आहे.

 

भाजपकडील तोकडे संख्याबळ

 

महाराष्ट्र विधानसभेची सदस्यसंख्या 288 असून बहुमतासाठी 145 जागांची गरज असते.
2019 च्या निवडणूकीत भाजपला 105 आणि पंढरपूर पोटनिवडणुकीत (Pandharpur by-election) जिंकलेली एक अशा 106 आणि अपक्ष व इतर अशा मिळून 110 ते 115 सदस्यांचा पाठिंबा आहे.
मात्र 145 चा आकडा गाठण्यासाठी भाजपाला 34 ते 40 आमदारांची (MLA) गरज आहे, ही बाब सध्यातरी शक्य नाही.

 

शरद पवारांचं सरकारवरील नियंत्रण

 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यामागे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा मोठा हात आहे.
अजूनही आघाडीतील तिन्ही घटक पक्षांवर त्यांचे नियंत्रण असून आघाडीत जर एखाद्या मुद्दयावरून वाद झाल्यास तो मिटवण्यासाठी ते पुढाकार घेत असल्याचे अनेक घटनांवरून समोर आले आहे.
त्यामुळे वैचारिक विरोधाभासानंतरही हे सरकार सहजपणे वाटचाल करत आहे.

 

कोरोनाकाळ आणि लॉकडाऊन

 

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर लगेचच चार महिन्यात कोरोनाचे संकट (Coronavirus in Maharashtra) ओढवले.
त्यानंतर लॉकडाऊनचा (Lockdown) निर्णय घेण्यात आला. त्या दिवसांपासून जी परिस्थिती निर्माण झाली ती अद्यापही पूर्वपदावर नाही.
अशा परिस्थितीत सरकार पाडले तर भाजपच्याच प्रतिमेवर त्याचा परिणाम होऊन घटक पक्षांना सहानुभूतीची शक्यता आहे.

 

पुढच्या काळात काय होऊ शकते

 

येत्या काही दिवसांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body election) होणार आहेत.
भाजपनेही आतापासून निवडणूकीत यश मिळवण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहे.
तर दुसरीकडे या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच एकत्रितपणे उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
त्यामुळे या निवडणूकांमध्ये जर आघाडीमधील पक्षांनी बाजी मारली तर भाजपाचे मिशन लोटस पुन्हा एकदा पुढे ढकलले जाईल.

 

Web Title : Mahavikas Aghadi Government | two years mahavikas aghadi government five reasons why bjps operation lotus still fails in maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 832 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Mumbai-Pune Highway | पोलिस प्रशासनाचा मोठा निर्णय ! जुना मुंबई-पुणे, नाशिक, सातारा महामार्गावरील अवजड वाहतूक पहाटे 4 ते सकाळी 8 पर्यंत बंद

Jalgaon Crime | धक्कादायक ! सासू अन् सासर्‍याच्या छळाला कंटाळून तरूणाची आत्महत्या 

Must Read
Related News