‘महाविकास’चं सरकार ‘हॉरर’ सिनेमा : देवेंद्र फडणवीस

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – आम्ही तीन पक्ष एकत्र येऊ असे वाटले नव्हते. पण आम्ही एकत्र आलो. सध्या मल्टिस्टाररचा जमाना आहे. तीन हिरो पाहिजेतच. त्यामुळे आमच सरकार आलं असे विधान अशोक चव्हाण यांनी केले होते. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. हा मल्टिस्टारर सिनेमा नव्हे, तर हा हॉरर सिनेमा आहे अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. तसेच शिवसेनेकडून लेखी हमी घेतल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता. यावरूनही त्यांनी शिवसेनेला लक्ष केले आहे.

लोकसभा निवडणूक हरल्यामुळे आता अशोक चव्हाण खूश असतील. किमान त्यांना मंत्री तरी होता आले. तो आनंद सुद्धा किती काळ टिकेल, हे आज सांगता येत नाही असे सांगत सत्तेसाठी एकत्र आलेले हे सरकार फार काळ टिकत नाही. एकत्र येण्यासाठी समाजकारण करावे लागते, असा टोला फडणवीसांनी चव्हाणांना लगावला.

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेकडून लेखी हमी घेतल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केला आहे. राज्य सरकारला संविधानाच्या चौकटीत राहून काम करावे लागेल, अशी लेखी हमी घेतली होती, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. यावरून फडणवीस यांनी शिवसेनेला टार्गेट केले. अशोक चव्हाण यांना नेमके काय सांगायचे आहे ? कालपर्यंत शिवसेना संविधानाप्रमाणे वागत नव्हती का ? की उद्धव ठाकरे सोनियांच्या दरबारी खरोखर तसे पत्र घेऊन गेले. अशी लाचारी आमच्या जुन्या मित्रावर येत असेल तर याचे आम्हाला वाईट वाटते असा टोला फडणवीस यांनी लगावला.