Mahavikas Aghadi | पुण्यातील विधानसभा मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला?; जाणून घ्या

पुणे : Mahavikas Aghadi | लोकसभेनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Elections 2024) तयारी सर्व पक्षीयांकडून सुरु झालेली दिसत आहे. यामध्ये लोकसभेप्रमाणेच महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचे ठरवले आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केलेली आहे. मात्र महाविकास आघाडीत छोटा भाऊ, मोठा भाऊ अशीही काही वक्तव्येही समोर येत आहेत.

तर लोकसभेला अधिक जागा हव्या होत्या मात्र मविआ ऐक्यासाठी दोन पावले मागे आलो असे वक्तव्य शरद पवारांनी (Sharad Pawar) केले होते. तसेच पुण्यातील मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतील पक्ष दावे करताना दिसत आहेत. मात्र पुण्यातील मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती आहे. (Mahavikas Aghadi)

वरिष्ठ पातळीवर या जागांबाबत चर्चा झालेली आहे. त्यानुसार काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला प्रत्येकी तीन तर शिवसेना उद्धव ठाकरे (Shivsena UBT) पक्षाला दोन जागा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. प्राथमिक चर्चेनुसार शहरातील कसबा (Kasba Assembly), पुणे कॅंटोन्मेंट (Pune Cantonment Assembly) आणि शिवाजीनगर (Shivaji Nagar Assembly Pune) या तीनही जागा काँग्रेसकडे असतील.
खडकवासला (Khadakwasla Assembly), पर्वती (Parvati Assembly), हडपसर (Hadapsar Assembly)
या जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे असतील तर कोथरूड (Kothrud Assembly) व
वडगावशेरी मतदारसंघ (Vadgaon Sheri Assembly) शिवसेना ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे.

स्थानिक पातळीवर जागांचा वाद असला तरी पक्षाच्या नेत्यांकडून जागा निश्चित आहेत.
तिथे काम सुरु करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Nashik Highway Accident | ‘माझा पुतण्या पळून गेला नाही, त्यानं मद्यप्राशनही केलेलं नव्हतं’;
अपघातानंतर आमदार दिलीप मोहिते पाटलांचे स्पष्टीकरण

OBC Leader Laxman Hake | काही मागण्या पूर्ण काही बाकी; लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित

Sinhagad Road Pune Crime News | सिंहगड रस्त्यावर थरार ! अल्पवयीन मुलाला गोळ्या झाडून मारण्याचा प्रयत्न (Video)