विधानपरिषद निवडणूक : मराठवाडा पदवीधरमध्ये महाविकास आघाडीच्या सतीश चव्हाणांची हॅट्ट्रिक

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन – विधानपरिषदेची निवडणूक भाजप आणि महाविकस आघाडीमध्ये अत्यंत चुरशीची होईल असे वाटले होते. मात्र महाविकास आघाडीने बाजी मारली असून सर्वांचे लक्ष्य वेधून घेतलेल्या मराठवाडा पदवीधर मतदरासंघ निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चुरस होईल अशी शक्यता होती, परंतु पदवीधर मतदारांनी अगदी पहिल्या फेरीपासून विजयाची आघाडी देत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पहिली पसंतीची १ लाख १६ हजार ६३८ मते देत तब्बल ५७ हजार ८९५ मताधिक्याने विजयी केले. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना ५८ हजार ७४३ मते मिळाली.

मराठवाडा पदवीधरसाठी ३५ उणेद्वार रिंगणात होते. मात्र खरी लढत होती ती महाविकस आघाडी आणि भाजप यांच्यातच. मतदारांनी साच का साथ देत पहिल्या फेरीपासून सतीश चव्हाण याना आघाडी दिली. पहिल्या फेरीत चव्हाण यांना २७ हजार २५० मते मिळाली, तर बोराळकर यांना ११ हजार २७२ मते मिळाली, सिद्धेश्वर मुंडे यांना २५०६ , रमेश पोकळे यांना ३ हजार ४७८ मते मिळाली, चव्हाण यांना पहिल्या फेरीअंतीच बोराळकर यांच्यापेक्षा दुप्पट मते मिळाली, दुसऱ्या फेरीअखेरीस सतीश चव्हाण ३४ हजार मतांची आघाडी घेतली.

तिसऱ्या फेरीत सतीश चव्हाण यांना २६ हजार ७३९ मते मिळाल्याने त्यांची एकूण मते ८१ हजार २१६ पर्यंत पोहचली, या फेरीत शिरीष बोराळकरांना १४ हजार ४७१ मते मिळाली, त्याची एकूण मते ४० हजार १८ झाली होती, या फेरी अखेर चव्हाण यांचे मताधिक्य ४१ हजार २०५ पर्यंत पोहचले होते, या फेरीपर्यंत १ लाख ५३ हजार ३० मतांची मोजणी पूर्ण झाली होती, तिसरी फेरी रात्री दीड वाजता घोषित झाली.

चौथ्या फेरीअखेरीस चव्हाण यांना १ लाख ७ हजार ९१६ मते तर भाजपाचे उमेदवार बोराळकर यांना ५४ हजार ३०५ मते मिळाली, या फेरीअखेरीस २१ हजार ३८८ मते बाद झाली, चौथ्या फेरीअखेर २ लाख २५ हजार ७४ मतांची मोजणी झाली, एकूण २ लाख ४० हजार मतदान झाले होते.चव्हाण यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली विजयी आघाडी पाचव्या फेरीअखेर कायम ठेवली अखेर २० तास सुरु असलेल्या मतमोजणीनंतर सतीश चव्हाण १ लाख १६ हजार ६३८ मते देत तब्बल ५७ हजार ८९५ मताधिक्याने विजयी केले.

भाजपा नेत्यांचा काढता पाय
भाजपने मराठवाडा पदवीधारची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पहिल्या फेरीची मतमोजणी सुरु झाली. एकूणच वातावरण पाहता सतीश चव्हाण हेच विजयी होतील असे चित्र दिसत होते त्यामुळे पहिल्या फेरीची मतमोजणी जाहीर होण्यापूर्वीच भाजपा नेत्यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला, उमेदवार शिरीष बोराळकर, खासदार भागवत कराड, आमदार अतुल सावे, विजय औताडे आदींनी मतमोजणी केंद्र सोडले तर संजय केणेकर आणि प्रमोद राठोड हे तिसऱ्या फेरीच्या मतमोजणीपर्यंत केद्रात होते.