मराठवाड्यात ‘महाविकास’चे सतीश चव्हाण यांचा दणदणीत विजय, भाजपाचे बोराळकर यांचा ५७ हजार ८९५ मतांनी पराभव

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी दणदणीत विजय मिळवित हॅट्रीक केली आहे. सतीश चव्हाण यांना पहिल्या पसंतीची १ लाख १६ हजार ६३८ मते मिळाली तर, भाजपाचे शिरीष बोराळकर यांना ५८ हजार ७४३ मते मिळाली. चव्हाण यांनी बोराळकर यांच्यापेक्षा जवळपास दुप्पट मते घेत ५७ हजार ८९५ मतांनी विजय मिळविला आहे.

पदवीधरमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात चुरस होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, चव्हाण यांनी भाजपाच्या अपेक्षा फोल ठरवत पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी पाचव्या फेरीअखेरी कायम ठेवली. बोराळकर यांच्या पाठापोठ अवैध मते तिसर्‍या क्रमांकावर आहेत.

You might also like