जिल्हा परिषदेत देखील ‘महाविकास’ ‘पॅटर्न’, पदाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपबरोबरचा 30 वर्षांपर्यंतचा संसार बिनसल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर चूल मांडली. महाविकास आघाडीला सत्तास्थापनेत यश मिळाल्यानंतर आता हाच प्रयोग स्थानिक पातळीवर राबवला जाणार आहे. यानंतर बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की राज्यातील काँग्रेस स्थानिक नेत्यांना शिवसेनेसोबत हातमिळवणी करण्यास मोकळीक आहे.

नागपूर, अकोला, नंदूरबार, धुळे आणि वाशीम येथील जिल्हा परिषदेच्या आणि त्या अंतर्गत होणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणूकांच्या कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला. या निवडणूका 7 जानेवारीला होणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. पाच जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. थोरात म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत आघाडी करण्याचे अधिकार पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. शक्ती नसेल तिथे शिवसेनेला सोबत घेण्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीचा पॅटर्न ग्रामपंचायतीत देखील गाजणार असे दिसत आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like