महाविकास आघाडीत फूट ? प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भूमिका हीच पक्षाची भूमिका, काँग्रेस स्वबळावर लढणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे NCP सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीच्या Mahavikas Aghadi माध्यमातून लढवल्या जातील असा विश्वास नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात व्यक्त केला होता. परंतु या विश्वासाला काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून छेद दिला जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्क्ष नाना पटोले ( Nana Patole) यांनी शरद पवारांच्या विधानावर भाष्य करताना आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची काँग्रेसची (Congress) तयारी आहे. मित्रपक्षांचे काय प्लॅनिंग आहे आम्हाला माहिती नाही. आमच्याकडे कोणताही प्रस्ताव नाही असे म्हटले आहे. त्यानंतर काँग्रेसचे (Congress) प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान (Naseem Khan) यांनीही याचा पुनरुच्चार केला आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

नसीम खान म्हणाले की, नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
त्यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची घेतली भूमिका हीच पक्षाची भूमिका आहे.
काँग्रेस हा सर्वात जुना पक्ष आहे. यापूर्वी तो राज्यातही 1 नंबरचा होता.
राज्यात अनेक वर्षे काँग्रेसने एकहाती सत्ता आणली आहे.
कॉंग्रेसला मानणारा राज्यात मोठा वर्ग आहे.
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे.
स्वबळावर निवडणुका लढल्यास पक्ष संघटनाही मजबूत होईल.
राज्यातील पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावरच लढवाव्यात ही भूमिका रास्त असल्याचे खान म्हणाले.

भाजपमधून कॉंग्रेसमध्ये येणाऱ्यांची मोठी यादी
भाजप BJP हा कायम आमचा विरोधी पक्ष आहे. शरद पवार भाजपाविरोधात मोट बांधत असतील, तर चांगली गोष्ट आहे. मात्र, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. भाजपमध्ये BJP गेलेले नेते पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची आपल्याकडे मोठी यादी आहे, पण आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवले जाईल, असे पटोले यांनी म्हटले आहे.

Web Title : Mahavikas front will break The role of the state president Nana Patole is the role of the party the Congress will fight on its own says naseem khan

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न वाढीसाठी घेतला निर्णय; वार्षिक 500 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट

आता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना पोलिसांनी केली अटक