1971 च्या युध्दातील ‘हिरो’ लेफ्टनंट जनरल वोहरा यांचा ‘कोरोना’मुळं मृत्यू, महावीर चक्रानं झाला होता सन्मान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महावीर चक्र विजेते लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) राज मोहन वोहरा यांचे कोविड-19 संसर्गाने निधन झाले. अधिकार्‍यांनी मंगळवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, वोहरा यांनी 14 जूनरोजी अंतिम श्वास घेतला.

एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, त्यांना स्टेंट टाकण्याच्या सर्जरीसाठी एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचे कोविड-19 च्या संसर्गाने 14 जूनरोजी निधन झाले. अधिकार्‍याने सांगितले की, त्यांचा अंत्यसंस्कार रविवारी करण्यात आला. महावीर चक्र देशातील दुसरा सर्वोच्च वीर पुरस्कार आहे. लेफ्टनंट जनरल वोहरा यांना 1972 मध्ये या सन्मानाने गौरवण्यात आले होते.