Mahavir Jayanti | महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त बिबेवाडी गंगाधाम येथे भव्य शोभायात्रा; मिरवणुकीत आमदार माधुरी मिसाळ आणि लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ सहभागी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Mahavir Jayanti | महावीर जयंतीनिमित्त जैन समाजातील चारही पंथीयांनी एकत्र येऊन त्यांच्यासह स्थानिकांचाही समावेश करून श्री सकल गंगाधाम महावीर जन्म कल्याणक महोत्सव समितीतर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. आनंद, समृद्धी आणि आपुलकीच्या वातावरणात बिबेवाडी गंगाधाम येथील वर्धमानपुरा सोसायटीच्या जैन मंदिरापासून या शोभायात्रेस सुरुवात झाली. या परिसरातील सर्व सोसायट्यांमधून मार्गक्रमण करत या मिरवणुकीची सांगता गंगाधाम फेज 2 येथील जैन मंदिरात झाली. आकर्षक पारंपारिक वेशभूषा, विविध संगीत समूह आणि ’त्रिसलानंदन वीर की…जय बोलो महावीर स्वामी की… जयकारे ’यांच्या जयघोषात त्यांना नमन व पूजन करून मिरवणूक काढण्यात आली. तसेच या मिरवणुकीत आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal) आणि लोकसभा उमेदवार (Pune Lok Sabha) मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) सहभागी झाले होते, अशी माहिती महावीर जनम कल्याणक महोत्सव समितीचे उमेश मांडोत यांनी दिली.(Mahavir Jayanti)

अशोक हिंगड यांनी सांगितले की, या शोभायात्रेत 2000 हून अधिक जैन अनुयायीही पायी चालत सहभागी झाले होते. हे नयनरम्य दृष्य पाहणसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. या भव्य मिरवणुकीत 5 रथ, 3 बँड पथक, 1 ढोल ताशा पथक, 1 डीजे सिस्टीम आणि हजारो स्त्री-पुरुष, लहान मुले, तरुण व वृद्ध सहभागी झाले होते.

अहिंसेचे प्रवर्तक भगवान महावीर स्वामींच्या वरघोड्याचे सौंदर्य पाहण्यासारखे होते.
फुलांनी सजलेली गाडी आणि मुलांच्या जयघोषाने आसपासचा परिसर दणाला हाता.
शोभायात्रेत पारंपारिक पोशाखात महिलांची संख्या केवळ उल्लेखनीयच नव्हती तर त्यांची श्रद्धा आणि भक्ती देखील दिसून येते.
उमेश मांडोत, अशोक हिंगड, आनंद कटारिया, सौ. सारिका संचेती, दिनेश अग्रवाल, अनिल पोरवाल, अनिल भन्साळी,
नरेश जैन, ललित गुंदेचा आदींनी शोभायात्रा यशस्वी अलौकिक आणि वाखाणण्याजोगा करण्यासाठी केवळ अथक परिश्रम घेतले. त्यांच्यासोबत उमेश मंडोत, अशोक हिंगड, आनंद कटारिया, दिनेश अग्रवाल, नरेश जैन, अनिल पोरवाल, बालचंद बांठिया, प्रवीण चोरबेले, सारिका संचेती, दिलीप जैन, तरुण मोदी, अनिल भन्साळी, तेजराज धोका, संजय राठोड, जितेंद्र राठोड, मणिलाल राठोड, प्रवीण संघवी, पुनित परमार, नितीन शहा, राजेंद्र दुग्गड, अजित सेठिया, सचिन सरनोत, महावीर कटारिया, प्रकाश फुलफगर आदींचे सक्रिय सहकार्य होते. तसेच शोभायात्रेत अशोक हिंगड, आनंद कटारिया, सारिका संचेती, ललित गुंदेचा, महेश कोठारी, नितीन शहा, तरुण मोदी, राहुल परमार, वंदना संजय राठोड यांच्यासह महिलांचा सहभाग अधिक होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Baramati Lok Sabha | बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यास तुमचे राजकीय करिअर धोक्यात येईल का? अजित पवार म्हणाले…

Pune Lok Sabha | पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ गुरुवारी भरणार अर्ज ! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, जंगी रॅली, भव्य सभा घेणार