महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार, ‘कुंपनच शेत खातंय’

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – महावितरणचे कर्मचारी मनमानी झाल्याने शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांची अक्षरशः अर्थिक पिळवणूक होत असून सध्या तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत असल्याचे चित्र कोलवडी परिसरात पहावयास मिळत आहे. शेतकरी हा ग्राहक आहे आणि त्याला सेवा देणे बंधनकारक असताना त्यांचीच अडवणूक करुन त्रास देण्याचे काम येथील महावितरणचे कर्मचारी करत असल्याचे स्थानिक शेतकर्यांचे म्हणणे आहे. या बरोबरच विज चोरीवर कसलाही अंकुश नाही याचा परिणाम नियमीत व इमानदार ग्राहकाला वारंवार होणाऱ्या विज पुरवठ्यात अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे.

कोलवडी हे हवेलीतील हरितपट्ट्यातील मोठ्या लोकवस्तीचे गाव आहे. बहुतेक लोकांचा शेती हाच व्यवसाय आहे. गावाच्या बाजुने वाहणाऱ्या मुळा मुठा नदीच्या पाण्यावर येथील शेती पिकते. शेतीसाठी केवळ आठ तास वीज उपलब्ध असल्याने रात्री अपरात्री शेती पिकांना पाणी देण्याची वेळ येते. अनेकवेळा फ्युज जाणे, लिंक जाणे अशा घटना घडतात. अशावेळी वायरमण उपलब्ध असला पाहिजे परंतु तो वेळेवर उपलब्ध होतच नाही तर उलट उध्दटपणे उत्तरे देऊन शेतकऱ्यांची अडवणूक करतो. साध्या कामासाठी महिना लागतो पण काम होत नाही. वायरमणच्या बेजबाबदार पणामुळे शेतकरी वर्गाला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

या गावामध्ये नागरिकीकरण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने प्लाॅटींगचा व्यवसाय जोरात चालू आहे. येथे जागा घेऊन आपले स्वतःचे घर बांधणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाकडून नविन विज जोडणीसाठी मोठ्या रकमेची मागणी करुन पिळवणूक केली जात आहे. घरगुती ग्राहकाला जोडणीसाठी पंधरा ते विस हजार रुपयाची मागणी केली जाते. अनेकांकडून ती गोळा करुन जोडणी केली आहे. इतकेच काय अनेक शेतकऱ्यांकडून शेतीसाठी लागणारी थ्री फेज जोडणीसाठी अडवणूक करुन काही अर्थिक तडजोड करुन अवैध जोडणी केल्याचेही दिसून आले आहे. यावरुन महावितरणचे मोठे नुकसान तर होतच असून सर्वसामान्य नागरिकांची मोठी पिळवणूक केली जात आहे असे चित्र अनुभवास मिळत आहे.

या विषयी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की घरगुती ग्राहकाला साधारणपणे तीन हजार सहाशे रुपये जोडणीसाठी खर्च अपेक्षित आहे. मग पंधरा हजार रुपयाची मागणी करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार हा प्रश्न आहे.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी