Mahavitaran Director Yogesh Gadkari | महावितरणच्या संचालक (वाणिज्य) पदी योगेश गडकरी

मुंबई : Mahavitaran Director Yogesh Gadkari | महावितरणचे संचालक (वाणिज्य) म्हणून श्री. योगेश गडकरी यांची सरळसेवा भरतीद्वारे निवड झाली आहे. आज त्यांनी संचालक (वाणिज्य) या पदाचा पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी श्री. योगेश गडकरी हे कार्यकारी संचालक (देयके व महसूल) म्हणून कार्यरत होते. (Mahavitaran Director Yogesh Gadkari)

नागपूर (Nagpur) येथील मूळचे रहिवासी असलेले योगेश गडकरी यांनी अमरावती येथून अभियांत्रिकी महाविद्यालयातून (Government College of Engineering Amravati) बी.ई. (कॉम्पूटर इंजिनिअरिंग) केले आहे. एप्रिल १९९४ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून वर्धा येथे रुजू झाले. त्यांनी मुंबई (Mumbai) मुख्यालयात विविध पदावर काम केले आहे. त्यांची पदोन्नती्द्वारे कार्यकारी संचालक (देयके व महसूल) या पदावर नियुक्ती करण्यात आली.

गडकरी यांचा वीज क्षेत्रातील अतिशय अभ्यासू अधिकारी म्हणून लौकीक आहे.
तसेच त्यांनी महावितरणच्या केंद्रीय बिलींग प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले असून त्यामुळे
ग्राहकांच्या तक्रारी कमी झाल्या असून महावितरणच्या महसुलात वाढ झाली आहेत.

Web Title :-  Mahavitaran Director Yogesh Gadkari | Yogesh Gadkari as Director (Commercial) of Mahavitaran

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा 

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : राज्य उत्पादन शुल्कचा अधिकारी 15 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांनी पुन्हा एकदा रोखला बालविवाह ! 8 मार्चपासून आजपर्यंत जिल्ह्यातील 602 ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह विरोधी ठराव, एसपी पी.आर. पाटील यांचा पुढाकार