Mahavitaran Strike | राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे, कामगार संघटनांची सरकारसोबत सकारात्मक चर्चा (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – खासगीकरणाला (Privatization) विरोध करण्यासाठी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.3) मध्यरात्रीपासून संप (Mahavitaran Strike) सुरु केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत संपकऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. या संपामध्ये (Mahavitaran Strike) राज्यातील एकूण 32 कर्मचारी संघटना सामील झाल्या होत्या. या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मंगळवारी रात्रीपासून आपल्या विजेच्या तिन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी काही मागण्यांबाबत संप (Mahavitaran Strike) सुरु केला होता. यामध्ये कंत्राटी कर्मचारी संघटनेचा देखील समावेश होता. यावेळी तीन- चार मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली. राज्य सरकारला या कंपन्यांचे कुठलेही खासगीकरण करायचे नाही. उलट पुढील तीन वर्षात या तीन कंपन्यांमध्ये 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य सरकार स्वत: करणार आहे. यामुळे आपले अॅसेट्स कुणाला देण्याचा किंवा अशा प्रकारे त्याचे खासगी करण करण्याचा कोणताही विचार नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

समांतर खासगी परवाने देण्याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,
समांतर परवाने पद्धतीला विरोध करण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली.
याबद्दल कर्मचाऱ्यांची समजूत घालताना ते म्हणाले की, हे नोटीफिकेशन खासगी कंपनीने काढले आहे.
जेव्हा MERC यावर नोटीफिकेशन काढेल त्यात आपण सरकारची सर्व बाजू मांडू.
तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न आहेत. कालांतराने त्यावरही तोडगा काढला जाईल, असे सुतोवाच देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Web Title :- Mahavitaran Strike | electricity employees strike meeting successful with dy cm of maharashtra devendra fadnavis know in detail