Mahavitaran Strike | खासगीकरणाविरोधात महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आक्रमक, मध्यरात्रीपासून तीन दिवसीय संपावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – खासगीकरणाला (Privatization) विरोध करण्यासाठी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर (Mahavitaran Strike) जाणार आहेत. अदानी समूहाला वीज वितरणाची परवानगी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. या विरोधात राज्यातील 30 संघटनांनी संपाची हाक (Mahavitaran Strike) दिली आहे. तीन दिवसीय राज्यव्यापी संपामुळे महाराष्ट्रातील भागांत तांत्रिक बिघाड झाला तर मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

अधिकारी व कर्मचाऱ्यांचा 72 तास संप

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी मंगळवार (दि.3) मध्यरात्री पासून संपावर (Mahavitaran Strike) जाणार आहेत. महावितरण कर्मचाऱ्यांकडून तीन दिवसीय राज्यव्यापी संप पुकारला आहे. गरज पडल्यास हा राज्यव्यापी संप तीन दिवसांनंतरही सुरु ठेऊ अशी भूमिका महावितरण कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

राज्यातील 30 संघटना संपात सहभागी

महावितरणचे खासगीकरण केले जाणार आहे. अदानी कंपनीने समान वीज वितरणासाठी परवानगी मागितली आहे.
तसेच यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे चित्र आहे.
आदानी कंपनीला कोणत्याही परिस्थितीत वीज वितरणाचा परवाना मिळू नये ही संपकरी कर्मचाऱ्यांची प्रमुख
मागणी आहे. या संपामध्ये राज्यातील 30 संघटना सहभागी होणार आहेत.
संपाच्या काळात वीजपुरवठा (Electricity) करण्याची जबाबदारी ही वरिष्ठ अधिकारी आणि सरकारची असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

Web Title :-  Mahavitaran Strike | mahavitaran strike against privatization maharashtra state electricity distribution company employees on three day strike against privatization

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Vinayak Raut | ‘नारायण राणे हैवानाची औलाद, चुलत भावाचा खून केला, नार्को टेस्ट करा’, खा. विनायक राऊतांचा खळबळजनक आरोप

Jalyukta Shivar Yojna | जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्ट अधिकारी, कंत्राटदारांवर महसुल विभागाची मोठी कारवाई

BSNL | नवीन वर्षात ‘बीएसएनएल’ने दिला यूजर्सला धक्का, बंद केले आपले सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान