महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानी निवडून येणार : खा. श्रीरंग बारणे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही मतदार संघात महायुतीचे तिन्ही उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील असे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शिवसेनेचे नगरसेवक राहूल कलाटे चिंचवड विधानसभा मतदार संघातून शिवसैनिक कलाटे यांचे काम करणार नाहीत, बंडखोरी करणा-यावर पक्षश्रेष्ठींकडून कारवाई होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

भाजप, शिवसेना, आरपीआई (आठवले) व इतर घटक पक्षांच्या महायुतीची पत्रकार परिषद चिंचवडमध्ये पार पडली. त्यामध्ये खासदार बारणे बोलत होते. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, खासदार अमर साबळे, गौतम चाबुकस्वार, चंद्रकांता सोनकांबळे आदी यावेळी उपस्थित होते.

बारणे म्हणाले की, शहरातील तिन्ही उमेदवरांसाठी महायुतीमधील सर्व घटक पक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र काम करत आहेत. त्यामुळे लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आणि गौतम चाबुकस्वार मोठ्या फरकाने निवडून येतील. शिवसेना-भाजप महायुती असताना राहूल कलाटे पक्षाच्या विरोधात जाऊन अपक्ष निवडणूक लढवित आहेत. त्यांना पक्षाचा कसलाही पाठिंबा नाही. शिवसैनिक त्यांचे काम कदापी करणार नाहीत. उलट दोनच दिवसांत त्यांच्यावर मातोश्रीवरून कारवाई होणार आहे.

जगताप म्हणाले की, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांच्यापुढे विरोधी पक्षाच्या उमेदवारांचे डिपॉझीट सुध्दा राहणार नाही. तिन्ही मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांचा विजय पक्का झाला आहे. आता निवडणुकीची केवळ औपचारिकता बाकी राहिलेली आहे, असेही जगताप म्हणाले.

Visit : Policenama.com 

You might also like