नागपूर: Mahayuti Seat Sharing Formula | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागावाटपाच्या संदर्भाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दिल्लीत अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत (दि.१८) बैठक झाली. दरम्यान या बैठकीत किती जागांचा तिढा सुटला, उमेदवार जाहीर करण्याबद्दल तिन्ही पक्षांचे काय ठरले आहे, याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माहिती दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” जागावाटपासंदर्भातील आमची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आहे. कालही भरपूर सरकारात्मक चर्चा होऊन जवळपास ज्या अडचणीच्या जागा होत्या. त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त जागा सोडवल्या आहेत, थोड्याशा जागा शिल्लक आहेत.
दोन दिवसात आम्ही त्या सोडवू. आमचं असं ठरलेलं आहे की, क्लिअर झालेल्या ज्या जागा आहेत, त्या-त्या पक्षाने आपापल्या सोयीने त्याची घोषणा करावी. भाजपाची पद्धत आहे की, निवडणूक समिती, संसदीय मंडळ अशा आमच्या सगळ्या प्रक्रिया असतात. त्या जवळपास संपत आल्या आहेत. आमची पहिली यादी कधीही येऊ शकते. म्हणजे लवकर येऊ शकते अशी परिस्थिती आहे. जागावाटप लवकरच सांगू “, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa