‘या’ खेळाडूला व्हायचय टीम इंडियाचा ‘कोच’, ‘हिटमॅन’ रोहितला केलं २ वेळा चॅम्पियन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले असून मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या सर्व विभागांसाठी अर्ज मागवले आहेत. त्याचबरोबर फिजियोथेरेपिस्ट, स्ट्रेंथ एंड कंडीशनिंग प्रशिक्षक आणि एडमिनिस्ट्रेटिव मॅनेजर या पदांसाठी देखील अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी ३० जुलैपर्यंत या पदांसाठी अर्ज करावेत असे बीसीसीआयने सांगितले होते.

टीम इंडिया का कोच बनना चाहता है ये स्टार, रोहित को 2 बार बनाया चैम्पियन

सद्य स्थितीत रवी शास्त्री हे भारतीय संघाचे प्रशिक्षक असून त्यांना या पदांसाठी अर्ज करण्याची गरज पडणार नाही. त्यांना थेट मुलाखतीद्वारे या प्रक्रियेत प्रवेश मिळणार आहे. त्याचबरोबर शेवटची तारीख जशी जवळ येत आहे तस तसे या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खेळाडूंची नावे समोर येत आहेत. यामधून समोर आलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेचा माजी खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक महेला जयवर्धने हा देखील भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करण्यास इच्छुक आहे. यासाठी तो अर्ज देखील दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

टीम इंडिया का कोच बनना चाहता है ये स्टार, रोहित को 2 बार बनाया चैम्पियन

महेला जयवर्धने यांच्याकडे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदाचा अनुभव देखील आहे. त्याचबरोबर २०११ मध्ये भारतीय संघाला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या गॅरी कर्स्टन आणि टॉम मूडी यांचा देखील या यादीत समावेश असल्याची माहिती पुढे येत आहे. जर महेला जयवर्धने याची या पदावर निवड झाली तर त्याचे रोहित शर्मा याच्याशी असलेल्या चांगल्या नात्यामुळे त्याचा फायदा होईल असे बोलले जात आहे. त्यामुळे महेला जयवर्धने भारतीय संघाला २०२३ च्या वर्ल्डकपसाठी तयार करू शकतो.

टीम इंडिया का कोच बनना चाहता है ये स्टार, रोहित को 2 बार बनाया चैम्पियन

दरम्यान, महेला जयवर्धने याची या पदावर निवड नक्की सांगितली जात आहे. त्याचबरोबर तो या पदासाठी प्रबळ दावेदार समजला जात आहे. त्यामुळे आता कपिल देव यांची सल्लगार समिती कुणाला प्रशिक्षक म्हणून निवडणार याकडे क्रीडा रसिकांचे लक्ष लागून आहे.

आरोग्यविषयक वृत्त –